पीएफ धारकांसाठी महत्वाची बातमी : आता मिळणार ८.१५ टक्के व्याजदर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २ नोव्हेबर २०२३ | देशभरातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. नुकतेच केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी एक निवेदन दिले आहे. यात असं म्हटले आहे की, कामगार मंत्रालय आर्थिक वर्ष २०२३ साठी पीएफ सदस्यांना एकूण ८.१५ टक्के व्याजदर देण्याच्या दिशेने काम करत आहे. एवढेच नाही तर एकूण २४ कोटी खात्यांमध्ये ८.१५ टक्के व्याज दिले आहे. ईपीएफओ व्याजदराबाबत सरकारची पावले योग्य दिशेने पडत असल्याबद्दल त्यांचे सरकार समाधानी असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

EPFO स्थापना दिनानिमित्त कॅबिनेट मंत्र्यांनी माहिती दिली. ७१ व्या EPFO ​​स्थापना दिनी, केंद्रीय कामगार मंत्र्यांनी यावर भर दिला की सरकारचे उद्दिष्ट भविष्य निर्वाह निधीची रक्कम ग्राहकांच्या खात्यात योग्यवेळी आणि योग्य व्याजासह हस्तांतरित करणे आहे. ते म्हणाले की, २०२२-२३ मध्ये एकूण भविष्य निर्वाह निधी योगदान २.१२ लाख कोटी रुपये आहे, तर मागील वर्षी म्हणजे २०२१-२२ मध्ये ही रक्कम १.६९ लाख कोटी रुपये होती.

EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २३४ वी बैठक मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी झाली. नवी दिल्ली येथे झालेल्या या बैठकीत बोर्डाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी EPFO ​​चा वार्षिक अहवाल मंजूर केला आणि तो संसदेत सादर करण्याची शिफारस सरकारला केली. २०२२-२३ आर्थिक वर्षात EPFO ​​चा एकूण गुंतवणूक निधी २१.३६ लाख कोटी रुपये आहे, यामध्ये पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी या दोन्ही रकमेचा समावेश आहे. गेल्या वर्षी २०२१-२२ या आर्थिक वर्षात ही रक्कम १८.३ लाख कोटी रुपये होती. जर आपण एकूण गुंतवणुकीची रक्कम पाहिली तर ती ३१ मार्च २०२३ रोजी १३.०४ लाख कोटी रुपये होती आणि गेल्या वर्षी हा आकडा ११ लाख कोटी रुपये होता. २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण २.०३ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS