दुचाकी अपघातात ; माजी नगरसेवकाचा दुर्देवी मृत्यू !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २१ ऑक्टोबर २०२३

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर अपघाताची मालिका सुरु असतांना आता पारोळा येथील एका माजी नगरसेवकाचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सारवे गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवर जात असतांना दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची घटना २० रोजी सकाळी १०.३० वाजेसुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील महेश उत्तमराव चौधरी (वय ४७) हे पारोळा येथून आपल्या बुलेट (एमएच – १९, सीएच- १३११) ने एरंडोल येथील प्रांत कार्यालयात कामानिमित्त जात होते. या वेळी तालुक्यातील सार्वे गावाजवळील जिओ कंपनीच्या पेट्रोल पंपासमोर धुळयाकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने महेश चौधरी यांच्या बुलेटला मागवून धडक दिली. यात महेश चौधरी यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना एरंडोल येथील सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

- Advertisement -

या बाबत पारोळा पोलिसांत अंकित महेश चौधरी यांच्या माहितीवरुन अज्ञात वाहन व अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास इक्बाल शेख करत आहेत. दरम्यान, दुर्दैवी अपघातात नगरसेवक महेश चौधरी यांचा मृत्यू झाल्याने पारोळा शहरासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS