जळगावात महिलेची काढली छेड अन बसला पब्लिक मार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | २० ऑक्टोबर २०२३ | शहरातील चित्रा चौकापुढे कोंबडी बाजार चौक परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ काढून, छेडखानी करणाऱ्या एका टवाळ खोराला महिलेसह नागरिकांनी चांगलाच धुतल्याची घटना 19 रोजी गुरुवारी घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संबधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कोंबडी बाजार भागातील खंडवा कटलरी या दुकानात आरीफ खाटीक (वय – ३१) हा तरुण कामाला असून गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दुकानाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून एक महिला आपल्या मैत्रिणीसोबत जात असताना, आरीफ खाटीक याने व्हिडीओ केला असल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने दिलेल्या माहितीनुसार तरुणाने व्हिडीओ केल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने संबधित तरुणाला विचारणा केली. त्या तरुणानेतरुणाला विचारणा केली. त्या तरुणाने व्हिडीओ करत नसल्याचे सांगितले.

मात्र, फोन तपासला असताना, डीलीट केलेल्या फंक्शनमध्ये हा व्हिडीओ आढळून आला. त्यानंतर त्या तरुणाने महिलेशी अरेरावी केली. हा प्रकार परिसरातील काही नागरिकांना लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संबंधित तरुणाला चांगलेच बदडून काढले.. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS