जळगावात भर रस्त्यावर तरुणाचा गळा चिरून खून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्यूज| ३ जून २०२४ | ; – जळगाव जिल्ह्यात खुनाची मालिका अद्यापही थांबलेली नाही. शहरातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील नाथ वाडा परिसरात राहणारे ललित प्रल्हाद वाणी वय-४५ हे सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कामाला आहेत. रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास कामावरून ते घरी येत असताना सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्याने ते घरी येत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर त्यांचा मृतदेह मिळून आला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने धाव घेतली. मयत ललित वाणी यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. अज्ञात इसमानी त्यांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत हे घटनास्थळी पोहचले असून फॉरेन्सिक टीम नमुने घेत आहे.

- Advertisement -

मयताचा खून का केला, कुणी केला याचा अद्याप उलगडा झाला नसून पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली आहे. मयताची बॅग रस्त्याच्या कडेला मिळून आली आहे.

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS