जळगाव जिल्हयात कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ज्वारी पिकाचे शासकीय हमीभाव केंद्र सुरू करावे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

आ एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे मागणी

- Advertisement -

जळगाव (साक्षीदार न्युज ) : – जिल्हयात कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ज्वारी पिकाचे शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्या बाबत आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला.

यावेळी ते म्हणाले जळगाव जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारी पिकाचे शासकीय हमी भाव केंद्र सुरू नसल्याने सदर केंद्रा अभावी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्हयातील शेतकऱ्यांचे हमी भाव केंद्र नसल्याने होत असलेले नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारी पिकाचे हमीभाव केंद्र सुरू करण्या बाबत शासनाने कोणती कार्यवाही केली अथवा करण्यात येत आहे. लवकरात लवकर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारी हमी भाव केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली.

- Advertisement -

या प्रश्नाला अन्न व नागरी पुरवठा ,ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर देताना सांगितले, जळगाव जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारी पिकाचे शासकीय हमी भाव केंद्र सुरू नसल्याने सदर केंद्रा अभावी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे अंशतः खरे आहे .राज्य शासनाने दि १५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या पत्रान्वये केंद्र शासनास सादर केलेल्या ज्वारी खरेदीच्या आराखड्यास केंद्र शासनाकडून दि २७ एप्रिल २०२४ च्या पत्रान्वये मंजुरी प्राप्त झाली आहे.

केंद्र शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्या नंतर राज्य शासनाने ९ मे २०२४ च्या पत्रान्वये अभिकर्ता संस्थांना ज्वारी खरेदीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्या करता उद्दिष्टे विभागून दिली आहेत त्यानुसार जळगाव जिल्ह्यात १८ खरेदी केंद्रावर एकूण ३४९४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आज अखेर एकूण १३५५० क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आलेली आहे. आणखी मागणी असल्यास माहिती घेऊन खरेदी केंद्र सुरू करण्या बाबत कार्यवाही करण्यात येईल असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS