जळगावात फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ९ ऑक्टोबर २०२३ | शहरातील एका तरुणीचे सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयित आरोपी दानीश अकबर तडवी (वय १९) यास अटक करण्यात आली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात 18 वर्षीय तरुणी आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. पीडीत तरुणी ही अल्पवयीन असतांना 2019 पासून संशयित आरोपी दानीश तडवीला ओळखत होती. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत दानीश तडवी याने तरूणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी नेवून सुरूवातीला अश्लिल कृत्य केले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील बनविले. यानंतर 2022 मेहरुण परीसरात एका ठिकाणी पीडीत तरुणीला फोटो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा त्रास देणे सुरूच होते. हा प्रकार सहन न झाल्याने पीडीत तरुणीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या पथकाने संशयित आरोपी दानीश तडवी याला रामेश्वर कॉलनी परीसरातून अटक केली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक रूपाली महाजन, अल्ताफ पठाण, योगेश बारी, मुकेश पाटील, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे यांनी केली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS