समाजामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे – नागेज कंडारे
वरणगाव ; – येथे अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी फलकाचे अनावरण व उदघाटन संघटनेचे राज्याध्यक्ष नागेज कंडारे यांचा हस्ते करण्यात आले.
अस्वच्छतेचे काम करून समाजाचे रक्षण करणारे सफाई कर्मचाऱ्यांचे समाजात फार मोठे योगदान असल्याचे नागेज कंडारे यांनी यावेळी व्यक्त केले.
शाखा उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी वरणगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री समीर शेख होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याध्यक्ष नागेज कंडारे, राज्य कोषाध्यक्ष धनराज पिवाल ,राज्य सचिव सुरेश बिसणाऱीया व राज्य सल्लागार कुंदन थनवार होते.
यावेळी वरणगाव शाखा अध्यक्ष म्हणून भिमराज मगरे, उपाध्यक्ष संतोष कोलीसंगत तर सचिव म्हणून रोहित चंदेले यांची नियुक्ती करण्यात आली.उपस्थित सदस्य व कर्मचाऱ्यांना नागेज कंडारे यांनी शासन स्तरावरील उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा बाबत मोलाचे मार्गदर्शन केले तर मुख्याधिकारी समीर शेख यांच्याशी संबंधित सफाई कामगार यांच्या समस्या व मागण्या बाबत देखील चर्चा करण्यात आली. सफाई कामगाराच्या मागण्या व समस्या बाबत आपण लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले.
वरणगाव नगर परिषदेतील तत्कालीन ग्रामपंचायत कालीन सर्व सफाई कामगारांचे समावेशन करण्याकरिता आयुक्त तथा संचालक व शासन स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे यावेळी संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले.
यावेळी कमलाकर सुरवाडे, विनोद पवार, छायाबाई उजलेकर, सुमनबाई नरवाडे ,गोपाल साबळे,जिवराज मगरे, मनाबाई तायडे,भगवतीबाई कोलीसंगत, लताबाई उजलेकर, याचां सह अनेक कर्मचारी उपस्थित होते.