चोपडा ; – आज दिनांक २२/१२/२०२३ रोजी चोपडा विधानसभा कार्यतत्पर आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे शुभहस्ते व माजी कर्तृत्ववान लोकप्रिय आमदार प्रा. चंद्रकांत आण्णा सोनवणे यांचे प्रमुख उपस्थितीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नुतन माध्यमिक विद्यालयात चुंचाळे ता.चोपडा येथे करण्यात आले.
या प्रसंगी माजी उपसभापती एम व्ही पाटील सर,संस्थेचे शालेय समिती अध्यक्ष श्री.जी टी पाटील सर,उपाध्यक्ष डॉ.पराग शिवाजीराव पाटील, सचिव श्री.प्रकाश आनंदराव पाटील,चोपडागटशिक्षणाधिकारी श्री.अविनाश पाटील,श्री.संजय महाजन संचालक, लासुर केंद्रप्रमुख श्री उत्तम चव्हाण,घोडगांव केंद्रप्रमुख श्री प्रमोद बाविस्कर, सौ रेखाताई पाटील सदस्य,सौ जैनताई सदस्य,श्री संजय शिंदे,पिंटू कोळी,श्री लोटन कुमावत,संदिप कोळी,श्री संजय सोनवणे पत्रकार,श्री रवींद्र सोनवणे प्राचार्य नूतन माध्य व उच्च माध्य चुंचाळे ,चोपडा तालुका विज्ञान समन्वयक संजय हरी पाटील तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांचे मुख्याध्यापक ,विज्ञान शिक्षक, प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी,ग्रामस्थ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकंदरीत माननीय आमदार ताईसाहेब व मा आमदार अण्णासाहेब यांची उपस्थितीमुळे विद्यार्थी प्रचंड आनंदात व उत्साहात दिसत होते प्रत्येक उपकरणाची विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करताना जागोजागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्यात.