back to top
शनिवार, एप्रिल 19, 2025

Cotton कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cotton

जळगाव ( साक्षीदार न्युज ) – जागतिक कापूस दिना निमित्त पळासखेडे मिराचे ता. जामनेर येथील दिनेश रघुनाथ पाटील ह्यांच्या कापसाच्या शेतामध्ये जैन इरीगेशन आणि साऊथ एशिया जैव तंत्रज्ञान संस्था जोधपूर आयोजीत कापूस परीसंवाद कार्यक्रमामध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

- Advertisement -

कापूस हे आपल्या राज्यातील महत्वाचे नगदी पिक आहे, ४२ लाख क्षेत्रावर cotton कापसाचे पिक घेतले जाते, उत्पादकता खुप कमी हेक्टरी ३३६ किलो रूई आहे. त्याचप्रमाणे राज्यात सर्वात जास्त क्षेत्र जळगाव जिल्ह्यात असुन उत्पादकता कमी आहे. त्यामुळे कापुस पिकाची उत्पादकता वाढविण्याची खुप आवश्यकता आहे, उत्पादकता आणि बाजारपेठ विचार करावा. जिल्हाधिकारी महोदयांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि उत्पादकता वाढविण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली व जैन ठिबक वरील कापूस पिकास भेट दिली, पिकामध्ये गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाकरीता वापरण्यात करण्यात आलेल्या जपानी पीबी नॉट तंत्रज्ञान बाबत जैन इरीगेशन चे वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ.बी डी जडे ह्यांनी माहीती दिली, ह्या तंत्रज्ञानाचे निष्कर्ष खुप चांगले आहे व शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे. कृषी संशोधन केंद्र ममुराबाद चे कापूस पैदासकार डॉ. गिरीश चौधरी ह्यांनी जागतिक कापूस दिनाचे महत्व, त्याचा उद्देश ह्यावर माहीती दिली, कापूसतज्ञ डॉ.संजीव पाटील ह्यांनी कापसाचे वाण निवडीचे निकष, लागवड अंतर, झाडांची संख्या तसेच कापूस पिकातील व्यवस्थापना बाबत मनोगत व्यक्त केले.

cotton

- Advertisement -

डॉ.बी डी जडे ह्यांनी कॉटन मिशन २.० मध्ये कापूस पिकाचे उत्पादन कसे मिळवावे तसेच कापूस लागवड गादी वाफा, मल्चिंग फिल्म, ठिबक सिंचन आणि फर्टीगेशनाचा वापर करण्याचा शेतकऱ्यांना आग्रह केला. उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा रमेश जाधव ह्यांनी कृषी विभागाच्या योजना विषद केल्या. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन शंका समाधान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाड चे प्रगतीशील शेतकरी संजय दशरथ पाटील होते त्यांनी कापूस शेतीतील अनुभव सांगीतले. कार्यक्रमा करीता जैन इरीगेशनचे विभागीय व्यवस्थापक दिलीप बऱ्हाटे, विक्री अभियंता मनोज पाटील, जैन ठिबक वितरक दिनेश पाटील, अजय पाटील, सुशांत चतुर, पी के पाटील, देवेंद्र पाटील आणि परीसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तिर्थराज इंगळे सरांनी केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Rohit Pawar | रोहित पवारांचं आवाहन: ‘फक्त ठाकरे नव्हे,...

 Rohit Pawar साक्षीदार न्युज । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीच्या संकेतांनी राजकीय वातावरण...

Income Tax Return | आयकर रिटर्नसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक;...

Income Tax Return साक्षीदार न्युज । नवीन आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली असून, आता नोकरदार आणि इतर करदाते गेल्या आर्थिक वर्षातील आयकर विवरणपत्र...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law |...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law साक्षीदार न्युज । एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४३ वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या ४६...

RECENT NEWS