back to top
शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025

Devendra Fadnavis ; शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून भिल्ल समाजासाठी स्वतंत्र योजना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Devendra Fadnavis ; आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकाराने मुंबई येथे बैठक संपन्न…

- Advertisement -

मुंबई, दि. ८ :- भिल्ल समाजाची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून भिल्ल समाजासाठी स्वतंत्र योजना सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या.

Devendra Fadnavis

- Advertisement -

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस आमदार मंगेश चव्हाण, एकलव्य संघटना प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे, माजी नगराध्यक्ष सावदा राजेश वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, अपर आयुक्त सुदर्शन नगरे, निलेश अहिरे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला आमदार मंगेश चव्हाण यांनी आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध प्रश्नांकडे उपमुख्यमंत्री तसेच अधिकारी वर्ग यांचे लक्ष वेधले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भिल्ल समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाईल. या समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. भिल्ल समाजासाठी घरकुल योजनेचा लक्षांक वाढवून अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.

भडगाव (जि.जळगाव) येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बैठकीत दिल्या. तसेच भगवान

Devendra Fadnavis

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS