भारत योगाची व योग्यांची जननी आहे… ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र भोळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

पुणे (साक्षीदार न्युज ) ; – उरुळी कांचन धर्माच्या उत्पत्ती नंतर हजारो वर्षांपूर्वी योगाची उत्पत्ती झाले असावी. भगवान शिवाला आद्य योगी , आदिगुरू संबोधण्यात येते. भगवान श्रीकृष्ण ,महावीर ,बौद्ध यांनी योगाची उपासना केली. महान ऋषी शंडील्याने भगवान श्रीकृष्णाला योगाची दीक्षा देऊन योग गुरु ठरले.

- Advertisement -

India

योगामुळे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक ऊर्जा मिळते. परमेश्वराविषयी जिज्ञासा वाढवण्यासाठी अष्टांग योग खूप महत्त्वपूर्ण आहे. रोग्याला योगी बनवण्याची क्षमता योगामध्ये आहे. अशा या योगाची भारत ही जननी आहे. भारत योगाची व योग्यांची जननी आहे असे मत ज्येष्ठ समाज सुधारक ह भ प डॉक्टर रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. जागतिक योगा दिना निमित्ताने सरस्वती शाळा उरुळी कांचन येथे योग उपचार मार्गदर्शन व योगाची प्रात्यक्षिके यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर रवींद्र भोळे यांनी योगा विषयी माहिती देताना वरील मत व्यक्त केले. याप्रसंगी पुढे मत व्यक्त करताना ज्येष्ठ समाज सुधारक ,पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे म्हणाले की योगाद्वारे भविष्यात होणारे आजार समूळ नष्ट होऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी निरोगी राहण्यासाठी तसेच अभ्यासामध्ये एकाग्रता प्राप्त करून बुद्ध्यांक वाढविण्यासाठी योगा करावा असे मत व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय कुंजीर सर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. व जागतिक योगा दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर सर,सर्व शिक्षक संजय कुंजीर सर, किरण तळेले,मनीषा मेमाणे,अमोल कुंजीर, लीना दिवार , लता चव्हाण, स्मिता तोडकरी , सरस्वती शाळेतील सर्व विद्यार्थी वर्ग पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS