Indian Army Shirepechi Dambhurni Village ; डांभुर्णी गावाच्या शीरेपेच्यात इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंटपदी निवड झाल्यामुळे एक मानाचा तुरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

चि.चारुदत्त दिनेश पाटील(सोनवणे) यूपीएससी (CDS) या परीक्षेतून ऑल इंडिया रैंक ९६ घेऊन इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट या पदी निवड .

- Advertisement -

यावल, ( साक्षीदार न्युज ) ; – तालुक्यातील डांभुर्णी गावातील रहीवासी निंबाजी काका सोनवणे सद्या चोपडा येथे वास्तव्यास असलेले यांचा नातू व गोंदिया येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत दिनेश निंबाजीराव सोनवणे यांचे चिरंजीव चारुदत्त दिनेश सोनवणे याचे संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी ने घेतलेल्या कम्बाईन डिफेन्स सर्विसेस (CDS)च्या परीक्षेतून ऑल इंडिया रँक 96 घेत भारतीय स्थलसेनेत (Indian Army)लेफ्टनंट -परमनंट कमिशन ऑफिसर या पदी निवड होऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल संपूर्ण निंबाजी काका सोनवणे आणि दिनेश सोनवणे व चंद्रशेखर सोनवणे परिवाराचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. अगदी दहावी किंबहुना त्या अगोदर पासूनच उराशी बाळगलेले स्वप्न त्याने जिद्दीने ,कठोर मेहनतीने व अभ्यासाने पूर्ण केल.

या प्रवासात त्याला आईवडिलांचा सक्षम पाठिंबा लाभला.खर तर माझ्या दृष्टीने तो सिविल सर्विस मटेरियल आहे आणि तो आयएएस आणि आयपीएस म्हणून देखील त्याची निवड शंभर टक्के झाली असती असं त्याचं अकॅडमीक कॅलिबर आहे कारण मी त्याला अगदी सर्विसेस प्रिप्रेटरी इन्स्टिट्यूटच्या (SPI)परीक्षेपासून मार्गदर्शन करत आलोय परंतु त्याची जिद्द एकच लेफ्टनंट व्हायचे तेही इंडियन आर्मी मधेच त्यामुळे वायू सेनेची परीक्षा पास होऊनही त्याने पुढे मार्गक्रमण केले नाही एवढच नव्हे तर मागच्या वर्षी पूर्वपरीक्षा ,मुख्य परीक्षा आणि सर्विस सिलेक्शन बोर्ड चा इंटरव्यू यशस्वी पूर्ण करून त्याची निवड झालेली होती मात्र मेडिकल मध्ये डोळ्याच्या अत्यंत छोट्याशा अडचणीमुळे त्याला जॉईन करता आलं नाही .

- Advertisement -

नाहीतर आता त्याच प्रशिक्षण पूर्ण झालेले असते परंतु त्याने न खचता पुन्हा तयारी केली आणि यावर्षी विजयश्री अगदी दिमाखात खेचून आणला त्याच्या पुढील सैनिकी करिअर साठी व आपल्या राष्ट्रभूमीच्या रक्षणा साठी ,देशसेवेसाठी प्रचंड शक्ती , साहस आणि यश मिळो अशी प्रार्थना आणि भरभरून शुभकामना .संपूर्ण सोनवणे परिवार व ग्रामस्थ डांभुर्णी .स्वयंदीप प्रतिष्ठान डांभूर्णी मराठा सेवा संघ जळगाव जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र स्वराज्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स जळगाव दिनवार्ता समुह आणी सह्याद्री बिल्डर्स जळगाव.

Indian Army Shirepechi Dambhurni Village

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS