इनोव्हा कार रेल्वे ट्रॅकवर कोसळली ; तिघांचा जागीच मृत्यू !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ७ नोव्हेबर २०२३ | राज्यात गेल्या काही महिन्यापासून अपघाताची मालिका सुरु असून आता आणखी एका अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली असून हा अपघात कर्जत-नेरळ मार्गावर झाला आहे. कर्जत किरवली ब्रिज वरून इनोव्हा कार रेल्वे ट्रॅकवर थेट खाली कोसळली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या मालगाडीची कारला धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या दोघांवर सध्या एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार ही कर्जत येथून नेरळच्या दिशेने जात होती. त्यावेळी कारमध्ये पाच ते सहा प्रवासी होते. मात्र ही कार कर्जत ते नेरळच्या दरम्यान असलेल्या किरवली पुलावर आल्यावर कारचालकाचे कारवरील नियंत्रण अचानक सुटले. आणि ही कार क्षणार्धात धाडकन ब्रिजवरून खाली असलेल्या पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर कोसळली. मात्र त्याच वेळी तेथून एक मालगाडी जात होती. त्या मालगाडीची कारला जोरात धडक बसली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला झाला, कारचेही मोठे नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आजूबाजूच्या लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघातातील दोन जखमींना तातडीने उपचारांसाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS