येत्या २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | २६ ऑक्टोबर २०२३ | अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी निमंत्रण दिले. पंतप्रधानांनी या निमंत्रणाचा स्वीकार करत या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘आजचा दिवस अनेक भावनांनी भरलेला आहे. आताच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी माझ्या निवासस्थानी मला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी मला राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येला येण्याचे आमंत्रण दिले. या आमंत्रणाबद्दल मी स्वतःला भाग्यवंत समजतो.

- Advertisement -

आपल्या आयुष्यात या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्याचे भाग्य मिळणे, हे माझे सौभाग्य आहे, अशा भावना मोदींनी एक्स सोशल मीडियावर व्यक्त केल्या. आपल्या पोस्टसोबत मोदींनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसोबतच एक फोटोदेखील शेअर केला. अयोध्येतील राम मंदिरात पुढील वर्षी २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीपासून हा सोहळा सुरू होणार आहे. सुमारे १० दिवस हा सोहळा चालेल. २२ जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर २४ जानेवारीपासून राम मंदिर भाविकांसाठी खुले होईल.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS