साक्षीदार | ३१ ऑक्टोबर २०२३ | राज्यात मराठा आंदोलनाच्या दरम्यान अनेक ठिकाणी सार्वजनिक व खाजगी मालमत्तेची तोडफोड आणि जाळफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणत घडल्या. मनोज जरांगे पाटील यांनी जाळपोळ करू नका. जाळपोळ झाल्यास वेगळा निर्णय घेणार, असे ठाम सांगितले आहे. तरी देखील आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बैठक घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री १० ते ११ अशी एक तास आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यभरातील जिल्हाधिकारी व सर्व पोलीस प्रमुख हजर होते. मराठा आंदोलनादरम्यान मालमत्तेचे व जीवितहानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुन्हे दाखल करुन अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात जर हिंसक वातावरण निर्माण होत असेल तर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सुचना देण्यात आले आहेत. मालमत्तेच नुकसान करणाऱ्यांकडून भरपाई घेण्याबाबत देखील बैठकीत चर्चा झाली. राज्यात अनेक ठिकाणी बस, आमदारांचे घरं जाळण्यात आले.