पुणे: – गोल्डन इरा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा यावर्षीचा गोल्डन स्टार ऑफ द इयर 2024आणि इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवॉर्ड सामाजिक कार्यकर्ते डॉ.रवींद्र भोळे यांना प्रदान करण्यात आला. कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालय, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, रसायन एवं उर्वरक मंत्रालय, एमएसएमइ उद्यम मंत्रालय, स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार सलग्नित संस्था गोल्डन इरा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या वतीनेडॉ मनिष शर्मा ह्यांनी वरील पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार अपंग सेवक, अध्यात्मिक ,धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते डॉरवींद्र भोळे यांना प्रदान केला.
डॉ.रवींद्र भोळे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेवक प्रवचनकार ,अपंग सेवक असून त्यांनी मराठवाडा भूकंपामध्ये कार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती ,कम्युनिटी हेल्थ वर्क, शैक्षणिक ,सामाजिक धार्मिक, वैद्यकीय ,अध्यात्मिक, नैसर्गिक आपत्ती ,वृक्षारोपण इत्यादी सह अनेक क्षेत्रात समर्पित भावनेने केलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. डॉ. रवींद्र भोळे यांनी संस्थात्मक कार्यही केलेले आहे. राज्यभर अनेक संस्थांमध्ये ते कार्यरत असून अपंग स्वयंसेवी संस्था शैक्षणिक संस्था इत्यादी कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत. पद्मश्री डॉमणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, पद्मश्री डॉक्टर मणीभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना स्फूर्ती मिळावी त्यांच्या कार्याचे मूल्यमापन व्हावे म्हणून त्यांना सरदार वल्लभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार ,मनी भाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार, एपीजे अब्दुल कलाम राष्ट्ररत्न पुरस्कार सरदार पटेल हिंदू रत्न पुरस्कार असे पुरस्कार देऊन कार्यकर्त्यांना स्फूर्ती दिलेले आहे.
आतापर्यंत त्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पंचविस हजार कार्यकर्त्यांना वरील पुरस्कार देऊन पुरस्कृत केलेले आहे, राष्ट्रसेवा करण्याची स्फूर्ती दिलेली आहे. तसेच पन्नास हजार कार्यकर्त्यांना व्यसनमुक्त केलेले आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने धर्मदाय व अल्प दरात त्यांनी लाखो रुग्णांना आरोग्य सेवा दिलेली आहे. कोरोना पंडेमिक मध्ये त्यांनी रात्रंदिवस विनामूल्य वैद्यकीय सेवा दिलेले आहे. तसेच रुग्णांना अन्नदान वस्त्रदान व सहकार्य केलेले आहे. वारकऱ्यांची सेवा ही त्यांनी केलेली आहे. उरुळी कांचन परिसरात महावीर मूकबधिर विद्यालय चे ते सल्लागार सदस्य असून आरोग्य सेवेत सक्रिय सहभागी आहेत. त्याचप्रमाणे सरस्वती शाळेचे उपाध्यक्ष आहेत तसेच प्रकाश गोयल मूकबधिर विद्यालय पेरणे फाटा, सेवाधाम अपंग विद्यालय,
वर्धा ,कोल्हापूर येथील अनेक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. पुरंदरच्या दुष्काळग्रस्त पूर्व भागामध्ये त्यांनी वैद्यकीय सेवा अत्यल्प दरात दिलेली आहे. टीबी ,कॅन्सर ,लेप्रसी व एड्स यासारख्या आजार होऊ नये म्हणून प्रिंटिव्ह प्रोग्रॅम घेतलेले आहेत. जिल्हा शैक्षणिक संशोधन समितीमध्ये ही त्यांनी कार्य केलेले आहे. त्यास पण राष्ट्रीय सेवा योजनांमध्ये अनेक विद्यालय कॉलेजमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे वृक्षारोपण केलेले आहे. एन वाय के क्रीडा मंत्रालय सरकारी संस्थेच्या वतीने त्यांनी अनेक युवकांसाठी उपक्रम राबविले आहेत. त्याबद्दल त्यांना क्रीडा मंत्रालयाची एनवायकेची अनेक सन्मानपत्र प्राप्त झालेले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन च्या माध्यमातून पल्स पोलिओ मोहीम राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याचप्रमाणे क्षयरोग दुरीकरण मोहीम कुपोषण मोहीम यासारख्या अनेक मोहीम राबवले आहेत. प्रायमरी हेल्थ सेंटर उरुळी कांचन चे ते रुग्ण कल्याण समितीचे विश्वस्त ही राहिलेले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन वाळवंटातील समाजसेवी सरोवर डॉ.रवींद्र भोळे हे पुस्तक पारधी समाजातील लेखक भास्कर भोसले यांनी लिहिलेले आहे. डॉ रवींद्रभोळे यांचे नाव गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सुद्धा समाविष्ट झालेले आहे. त्यांना यापूर्वीही इंटरनॅशनल गोल्डन पीस अवॉर्ड ,जीनियस वर्ल्ड रेकॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल पीस अवॉर्ड मनमफाउंडेशन चा प्राप्त झालेला आहे. त्यांना आतापर्यंत चारशे एंशी नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट ,डिस्ट्रिक्ट अवॉर्ड्स प्राप्त आहेत. पद्मश्री डॉक्टर मणीभाई देसाईजींनी त्यांना उरुळी कांचन गॅस्ट्रो साथीत कार्य केल्याबद्दल बायफ संस्थेच्या वतीने खास सन्मानपत्र प्रदान केलेले आहे. डॉ. रवींद्र भोळे दिल्ली येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंचाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, एस एस आय एफ चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संस्था जयपुर, आयुष नॅशनल वैद्यकीय संस्था पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख, वारकरी मंच महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विषयक प्रमुख, तसेच लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे विश्वस्त संचालक आहेत. तसेच डॉक्टर रवींद्र भोळे हे चंद्रप्रकाश धोका कर्णबधिर निवासी विद्यालय पेरणे फाटा, सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय वाजेवाडी शिरूर कोरेगाव भीमा,या संस्थांचे सल्लागार सदस्य व मानसेवी वैद्यकीय अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे वेद प्रकाश गोयल निवासी मतिमंद विद्यालय फुलगाव यांचे सदस्य व माजी डायरेक्टर आहेत. निरपेक्ष समर्पित भावनेने कार्य करणारे डॉ.रवींद्र भोळे हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. मॅगसेस विनर पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई प्रतिष्ठान ,पद्मश्री डॉ मनीभाई मानव ट्रस्ट सह अनेक संस्थांचे संस्थापक सदस्य असून, डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन उरुळी कांचन चे संस्थापक अध्यक्ष आहेत . श्री संत यादव स्कूल शिंदवणे या शाळेचे सल्लागार सदस्य आहेत.वाचन संस्कृती वाढावे म्हणून त्यांनी अनेक वाचनालय सुरू केली त्यात रवींद्र शांतिनिकेतन ग्रंथालय आजही विनामूल्य सुरू त्यांच्याकडे दहा हजार पुस्तके उपलब्ध त्या पुस्तकांचे विना मोबदला वितरण करण्यात वाचन संस्कृती वाढवण्यात सहकार्य केल्या जात वरील कोणत्याही संस्थेकडून ते कसलेही अनुदान किंवा सरकारी मदत घेत नसून निवड निष्काम कर्मयोग साधत आहेत.त्यांना गोल्डन स्टार ऑफ द इयर 24, त्याचप्रमाणे इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवॉर्ड मिळाल्याबद्दल अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.