International Yoga Day ; ऐनपूर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

International Yoga Day साक्षीदार न्युज ; – ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात २१ जुन २०२४ हा दिवस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास व क्रीडा विभाग स्थापित “योगा वेलनेस सेंटर” अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील प्रा. डॉ. पी. आर. महाजन उपस्थित होते.

- Advertisement -

👉🏾 जामनेर पोलीस स्टेशनवर तुफान दगड फेक – दहा ते बारा पोलीस जखमी

रासेयो विभागीय समन्वयक डॉ. जे. पी. नेहेते यांनी व्यायाम तसेच योगचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे, रोज योग केल्याने ताणतणावपासून आपण दूर राहतो असे सांगितले. तसेच प्रशिक्षक डॉ. महाजन यांनी नियमित योगासने केल्याने आपली हाडं, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहातात, त्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते असे सांगितले. योग साधनेने असाध्य रोगांपासून आपल्यला मुक्ती मिळू शकते. माणसाला जीवनात सुखी व निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचे विशेष महत्व आहे. योगासने केल्याने विविध आजारांपासून मुक्तता मिळू शकते असेही त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी अध्यक्षीय भाषणात माणसाने योगसाधनेची मार्गदर्शक तत्वे आचरणात आणल्यास मनाच्या उत्तम प्रतीचे शुद्धीकरण प्राप्त होते असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमा नंतर योग प्रशिक्षक प्रा. डॉ. पी. आर. महाजन यांनी उपस्थित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विविध प्रकारचे योगासने करवून घेतली. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

International Yoga Day

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS