पारोळा एरंडोल मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉ.संभाजीराजे पाटील यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; – येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पारोळा एरंडोल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉ.संभाजीराजे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता मानली जात आहे. सद्या या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे चिमणराव पाटील हे आमदार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतर राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही मोठी फूट पडून दोन गट पडले.यातच या मतदारसंघात तीन वेळा आमदार व पालकमंत्री राहिलेले डॉ.सतीश पाटील हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातच राहिले.

- Advertisement -

*आमच्या व्हाटसप ग्रुपला आताच जॉईन व्हा*

मात्र अश्यातच डॉ.संभाजीराजे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून पारोळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या घड्याळाची टिक टिक सुरू ठेवली.व तेही या मतदारसंघात आमदारकीचे इच्छुक उमेदवार म्हणून तयारीला लागले.महिनाभरातच राज्य विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.यावर भाजप,शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती कायम राहील असे दिसते.आता मतदारसंघ कोणाला मिळावेत यावरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे.भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौर्यापूर्वी नुकताच एक अंतर्गत सर्व्हे घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.यामध्ये महायुतीकडून ज्या दोन तीन नावांचा सर्व्हे झाला यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे डॉ.संभाजीराजे पाटील यांच्या बाजूने सर्व्हेचा सर्वाधिक कल असल्याचे समजते.यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पारोळा एरंडोल मतदार संघावर दावा सांगितला जातोय.तसे झालेच तर मतदारसंघात डॉ.संभाजीराजे पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे विधानसभेतील नवे शिलेदार असतील हे निश्चित मानले जात आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS