साक्षीदार | ११ ऑक्टोबर २०२३ | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला साडेतीनशे वर्षां पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त बजरंग दलाच्यावतीने काढण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रे दरम्यान आयोजिलेल्या सभेत गायकर बाेलत हाेते. कल्याण पाेलीस प्रशासनाने अफजलखान वधाचे पाेस्टर काढल्याने गायकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
गायकर म्हणाले कि, आमच्या नामर्द सरकारचा तो अफजलखान बाप लागतो का ? पोलीस प्रशासनाने मुख्यमंत्र्याना विचारावे अफजलखान आमचा काका मामा लागतो का ? ज्याने आमच्या आया बहिणी पळवल्या आणि मरवल्या कोण लागतो ताे ? असा सवाल विश्व हिंदू परिषदेचे नेते शंकर गायकर यांनी सरकारला केला आहे. अफजलखान याचा वधाचा पाेस्टर लावणे हा काही गंभीर गुन्हा नाही. त्यामुळे ज्या अधिका-यांनी ही कारवाई केली त्याची गांभीर्याने सरकारने विचारणा केली पाहिजे. या पाेस्टरच्या माध्यमातून इतिहास जागवण्याचे काम बजरंग दलाने केलं आहे. अफजलखानाचा सरकारशी काय नातं आहे? असा सवाल उपस्थित करत अफजल खानाचा वध केला आहे म्हणूनच वाघ नख आणली जात आहेत. कारण वाघ नख ही शौर्याचं प्रतीक आहेत असेही गायकर यांनी स्पष्ट केले. बॅनर लावणं गुन्हा असेल तर मग वाघनख कशाला आणता? अशी विचारणा देखील त्यांनी सरकारला केली आहे.