Chandrashekhar Bawankule साक्षीदार न्युज ; – विधानसभा २०२४ च्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यावर विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कालच्या दिवशी शरद पवार यांनी देखील सांगितले कि , जर का आम्हाला मते जास्त आहेत तर जाग कशाकय कमी आल्या आहेत , असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. त्याला देंवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर लक्ष्य साधले .
👉🏼 मोठी बातमी ; जळगावचा RTO अधिकारी ACB च्या जाळ्यात
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानभवन परिसरात माध्यमांशी संवादतांना सांगितले कि , शरद पवारांचा आम्ही सन्मान करतो. पण या वयात त्यांनी असा खोटारडेपणा करायचा का ? त्यांनी पराभव स्वीकारायला हवा. पराभव मान्य करता येत नाही म्हणून जनतेची दिशाभूल करून आपल्या पदरी आलेले अपयश लपवण्याचा प्रयत्न शरद पवार हे करत आहेत, असे देखील त्यांनी यावेळेस सांगितले .
पुढे बोलताना, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपला पुन्हा पराभव होईल, अशी भीती त्यांच्या मनात आहे, अशी टीका त्यांनी केली. मारकडवाडीत आलेले लोक शरद पवारांचे कार्यकर्ते आहेत. तिथे जनता कुठे आहे ?मारकडवाडीत या आधी देखील अनेकवेळा ईव्हीएमवर मतदान करण्यात आलेले आहे . मग त्यावेळेस शरद पवार यांनी ईव्हीएमवर आक्षेप का नाही घेतला ? असा प्रश्नदेखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित केला. अपयश लपवण्याचं पाप शरद पवार करत असून कितीही नौटंकी केली, तरी महराष्ट्र या नौटंकीला कंटाळला आहे. जनता आता विकासाच्या बाजूने आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
दरम्यान, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यास राजीनामा द्यायला तयार आहे, अशी घोषणा केली आहे, याबाबत विचारलं असता, हा खोटारडेपणा असून संविधानाचा अपमान आहे. खरतर लोकसभेचे ३१ खासदार मविआचे निवडून आले मग त्यांनी पण राजीनामे दिले पाहिजे. मुळात काही निवडणुका आम्हीही हरलो, पण कधी ईव्हीएमला दोष दिला नाही. आम्ही पराभवातून शिकलो, असं ते म्हणाले.