नशिराबाद साळी समाजाचा जाहिर पाठिंबा – प्रदिप साळी
नशिराबाद ( सुनिल भोळे ) ; – आपणास या पत्राद्वारे कळवितांना मनस्वी आनंद होत आहे की, आपणांस जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मिळाली असून आपण यापुर्वीच या मतदार संघातून पाच वेळेस निवडून येऊन या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. तसेच शासनाचे मंत्री म्हणून सुध्दा उत्कृष्ट काम केलेले असून, आपण या कालावधीमध्ये केलेली उत्कृष्ट कामगिरी तसेच जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मतदारांचे आपल्या कारकिर्दीत आपण विविध प्रश्न मार्गी लावले आहेत.
LIVE | गुलाबरावजी पाटील यांची जाहीर सभा । नशिराबाद । शिवसेना । २०२४ ।
तसेच आपल्या मतदार संघामध्ये आपण अल्पसंख्यांक बांधवांचे पाठीशी आपण वेळोवेळी खंबीरपणे उभे राहिलेले असून त्यांना सर्वतोपरी मदत करीत आलेले आहेत.
याचीच जाण लक्षात ठेवून स्वकुळी साळी समाज मंडळ, नशिराबाद मधील संपूर्ण साळी समाज यांचे वतीने मी प्रदिप साळी समाज अध्यक्ष आपणास सदर निवडणूकीत आमच्या साळी समाजाने आपणास जाहिर पाठिंबा दिलेला आहे. येणाऱ्या निवडणूकीत आपणास भरपूर मताधिक्याने (लिडने) विजयी करण्याचा आमच्या समाजाचा मानस आहे.
याच अनुषंगाने आम्ही जळगांव ग्रामीण मतदार संघामध्ये आपला प्रचार सुध्दा करीत आहोत, कारण आपल्या सारखा आमदार आम्हांला पुन्हा लाभो हिच आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे.
तरी आपणास या निवडणूकीत पुनःश्च एकदा शुभेच्छा व आमच्या संपूर्ण साळी समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असून आपण निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावे हिच मनापासून प्रभुचरणी प्रार्थना…!
“विजय साळी , बापू साळी ,विशाल साळी ,सचिन साळी ,प्रविण साळी ,राजेंद्र साळी , शुभम साळी , मयुर साळी ,योगेश साळी , शुभम साळी ,धनराज साळी आदि उपस्थित होते.