साक्षीदार | २३ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक ग्रामीण व शहरी भागातील तरुणाचे ITI चे शिक्षण झालेला असते. त्याच तरुणांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. त्यांच्यासाठी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली असून ती म्हणजे पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे ज्युनिअर टेक्निशियन ट्रेनी पदांसाठी भरती केली जाणार आहे.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची
सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निशियन ट्रेनी (इलेकट्रीशियन).
शैक्षणिक पात्रता – ITI (इलेकट्रीशियन)
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी –
खुला/ ओबीसी – २०० रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – कोणतीही फी नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
अधिकृत बेवसाईट – https://www.powergrid.in/