Agniveer पहूर ( अशोकराव चव्हाण ) ; – जामनेर येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी(तांडा) येथील नवयुवक तरुण,चि.संकेत तुकाराम चव्हाण याची देशाच्या संरक्षणासाठी अग्निवीर या पदावर आणि चि.ईश्वर गणेश राठोड याची महाराष्ट्र गृहरक्षक दल(होमगार्ड) पदी निवड झाल्याबद्दल जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था(रजि)-पिपळगांव कमानी तर्फे संत सेवालाल महाराज व आई जगदंबा मंदिर सभागृह मधे जाहिर सत्कार सोहळा कार्यक्रम दिनांक-१६’अॉक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आयोजित करण्यात आला.
या सत्कार सोहळा कार्यक्रमास येथील ज्येष्ठ नागरिक-बाबूराव चव्हाण आणि भवरलाल चव्हाण,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,पोलिस पाटील तथा संस्थेचे उपाध्यक्ष-इंदलभाऊ चव्हाण,माजी ग्रामपंचायत सदस्य-प्रल्हादभाऊ चव्हाण,उपसरपंच तथा संस्थेचे संचालक-संदिपभाऊ राठोड,ग्रामपंचायत सदस्य-कैलासभाऊ चव्हाण,संस्थेचे संचालक-गणेशभाऊ राठोड,तुकारामभाऊ चव्हाण,गोकुळभाऊ राठोड यांच्याहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,चि.संकेत आणि चि.ईश्वर यांनी आपल्या आईवडील यांच्या आशिर्वादाने व स्वतःच्या हिंमतीने आणि मेहनतीने हे यश संपादन केले आहे आणि या दोघांची गावातून प्रथमच अग्निवीर आणि होमगार्ड या पदावर निवड झाल्याने आपल्या गावाची मान संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रात उंचावली आहे याचा आम्हाला गर्वचनाही तर अभिमान आहे.या दोघांच्या मेहनतीचा व निवडीचा गावातील सर्व नवयुवक तरुणांनी आदर्श घेऊन प्रेरणा व मार्गदर्शन घ्यावा आणि अधिकाधिक नवतरुण यांनी वाईट व्यसनांपासून दूर रहावे तसेच या दोघांचा आदर्श घेऊनृ पूढे जात रहावे गावातील सर्व स्पर्धा परिक्षा देणाऱ्या होतकरु नवयुवकांना संस्थेतर्फे अभ्यासासाठी स्पर्धा परिक्षेसाठी लागणारी पुस्तके आम्ही उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन दिले.यानंतर गावातील पोलिस पाटील तथा संस्थेचे उपाध्यक्ष-इंदलभाऊ चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,या दोन्ही नवतरुणांच्या निवडीमुळे आपल्या गावाची मान उंचावली आहे याचा आम्हा सगळ्या गावकरींना अभिमान आहे असेच गावातील सगळ्या तरुणांनी मेहनत करावी आणि पुढे जात रहावे संस्थेच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल से सांगितले.
या कार्यक्रमास गावातील नागरिक-लालचंदभाऊ चव्हाण,गोविंदाभाऊ चव्हाण,विजयभाऊ चव्हाण,मलखाण राठोड,ग्रामपंचायत शिपाई-बालचंद चव्हाण,बाळू चव्हाण,पिंटू चव्हाण,सचिन चव्हाण,उमेश चव्हाण,अमोल चव्हाण,कृष्णा राठोड,सेवालाल महारज पुजारी-राजाराम चव्हाण,यांच्यासह गावातील असंख्य समाजबांधव आणि शालेय मुले उपस्थित होते.