साक्षीदार | २२ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही वर्षापासून बॉलिवूड क्षेत्रातील अनेक अभिनेते अभिनेत्री वेगवेगळ्या प्रकरणात नाव समोर आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झालेली असतांना आता बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेती दलीप ताहिल यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दापील ताहिल यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ६५ वर्षांच्या या अभिनेत्याला ५ वर्षे जुन्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दारूच्या नशेमध्ये कार चालवणं दलीप ताहिल यांना महागात पडले आहेत.
अभिनेत्याने दारूच्या नशेत कार चालवत रिक्षाला धडक दिली होती. ही घटना २०१८ मध्ये घडली होती. या अपघातामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली होती. तब्बल ५ वर्षांनंतर याप्रकरणी कोर्टाने अभिनेत्याला २ महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात अभिनेत्याचा दारूचा वास येत होता. अभिनेत्याला नीट चालता येत नव्हते. त्याला नीट बोलता येत नव्हते. हे सर्व पुरावे ग्राह्य धरून न्यायदंडाधिकाऱ्यांनी दलीप ताहिलला दोषी ठरवून दोन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. डॉक्टरांनी दिलेल्या पुराव्यावर विश्वास ठेवून न्यायालयाने हा निर्णय घेतला.
हे संपूर्ण प्रकरण 2018 मधील म्हणजेच 5 वर्षे जुने आहे. या अभिनेत्याला अपघातानंतर मुंबई पोलिसांनी अटक केली होती. अभिनेत्यावर दारूच्या नशेत गाडी चालवण्याचा आणि कारने रिक्षाला धडक दिल्याचा आरोप होता. या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला गंभीर जखमी झाली होती. या अपघातानंतर दलीप ताहिलने रिक्षाला धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला होता. हे प्रकरण कोर्टात सुरूच राहिले पण अभिनेत्याची जामिनावर सुटका झाली होती. आता या प्रकरणाचा निकाल आला आहे. दरम्यान, दलीप ताहिल गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्याने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. दलीप ताहिल यांनी ‘बाजीगर’, ‘कयामत से कयामत तक’, ‘राजा’, ‘आखरी रास्ता’, ‘दौलत की जंग’ आणि ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.