Jain Industries Group ; समाजासाठी दात्वृत्व करण्यात जैन उद्योग समूह सदैव अग्रेसर- ना. गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

गौराई बहुउद्देशिय संस्थेचे उद्घाटन, गौराई हाॕलचे लोकार्पण

- Advertisement -

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी) – समाजातील उपेक्षित घटकांचे आपण कायमच देणं लागतो याच उदात्त भावनेने जैन उद्योग समूह सदैव कार्य करत आहे. पार्वतीनगरमधील रहिवाशांसाठी गौराई बहुद्देशीय संस्था व हाॕलचे नूतनीकरण करून अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. घटस्थापनेच्या दिवशी गौराई सेवा घट असून दात्वृत्वाने सेवा करणारा जैन उद्योग समूह असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

- Advertisement -

शहरातील गिरणा पाण्याच्या टॉकीजवळील असलेल्या पार्वतीनगर येथील गौराई बहुउद्देशीय संस्था उद्घाटन व नुतनीकरण सोहळ्यास उद्घाटक म्हणून मा. ना. श्री. गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या कोनशीलेचे अनावरण व गौराई हाॕलचे उद्घाटन त्यांच्यासह ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन, संघपती श्री. दलिचंद जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष श्री. अशोक जैन, श्री. राजा मयूर, आमदार सुरेश भोळे, माजी नगरसेविका सौ. उज्ज्वला बेंडाळे, सौ. ज्योती जैन, जैन इरिगेशनचे सिस्टीमचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डाॕ. अनिल ढाके, भाजप उपाध्यक्ष रोहित निकम, बांधकाम व्यवसायिक अनिश शहा, माजी नगरसेवक अमर जैन पृथ्वीराज सोनवणे यासह जैन परिवारातील सर्व सदस्य व पार्वतीनगर वाशियांची उपस्थिती होती.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘श्रध्देय भवरलाल जैन तथा मोठ्याभाऊंनी माळी दादांच्या विनंती वरून उभा केलेला गौराई हाॕल ची पुनर्रचना केली असून आज पुन्हा सुसज्ज सेवेसह उपलब्ध करून दिला. गौराई बहुउद्देशीय संस्था मंदिर परिसरात श्री शंकर-पार्वती, श्री. दत्तगुरू, श्री. गणेशाची मूर्ती व भगवान शंकराची पिंड, नंदी याठिकाणी विराजमान होणार आहेत. तसेच या आवारात बहुउद्देशीय हॉल, खुली व्यायाम शाळा, वाचनालय, किलबिल, बेंचेस अशा अन्य सुविधांसह लोकार्पण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी जबाबदारीने त्याची देखभाल करावी असे आवाहनही त्यांनी केले.

माजी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळेंनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांनी ३५ वर्षापूर्वी गौराई हाॕलची निर्मिती केली होती. त्यावेळी मंदिराचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव ते होऊ शकले नाही. आदरणीय अशोकभाऊंच्या सामाजिक दात्वृतातून ते आज घटस्थापनेच्या दिवशी साकार झाले आहे. आदरणीय अशोकभाऊंसह सर्व जैन इरिगेशनच्या सहका-यांचे मनापासून आभार व्यक्त करते.’

पार्वतीनगर वासियांच्यावतीने अशोक जैन यांचा हृदय सत्कार

गौराई हाॕलसह नुतनीकरण व मंदिर निर्माणासह अन्य सुविधा उपलब्ध केल्याबद्दल पार्वतीनगर वाशियायांच्या वतिने रामजन्मभुमी मंदिराची प्रतिकृती,शाल, श्रीफळ व सुतीहार देऊन अशोकभाऊ जैन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी गौराई बहुउद्देशीय संस्थेचे सर्व सदस्य व पार्वतीनगर वाशिय उपस्थित होते. मंदिर निर्माण करण्यात भरीव योगदान दिल्याबद्दल मान्यवर नागरिकांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौराई बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष राजीव देशमुख, खजिनदार मोहन बेंडाळे, सदस्य भगवान भंगाळे, शामकांत पाटील, सचिन येवले, संजय दर्यापूरकर, मनोज चौधरी, राजेंद्र सदावर्ते, जयश्री वायकोळे, विद्या चौधरी, निमंत्रित सदस्य डिगंबर पाटील, पी. बी. पाटील, प्रा. एस. एन. भारंबे, गणेश सुरळकर यांच्यासह पार्वतीनगर रहिवासी व जैन इरिगेशनचे सहकारी यांनी सहकार्य केले.

प्रास्ताविक सचिव अनिल जोशी यांनी केले. सुत्रसंचालन जयदीप पाटील यांनी केले. आभार डाॕ. अनिल ढाके यांनी मानले.

Jain Industries Group

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS