रान डुकराचा हल्ला ; दोन मजूर जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव :– ज्वारी कापण्याचे काम सुरू असतांना रानडुकराने हल्ला केल्याने दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील पाथरी शिवारातील शेतात गुरूवारी २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली . जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

पाथरी गावात अमर राजाराम बारेला (वय १९) आणि दिनू मोलशा बारेला (वय २०) अशी दोन्ही जखमींची नावे आहेत . गुरूवारी २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाथरी शिवारातील शेतात ज्वारी कापण्याचे काम करत असतांना त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. यात हल्ल्यात अमर बारेला यांच्या डोक्याला, कमरेला आणि हाताला चावा घेतला तर दिनू बारेला याच्या हाताचे बोटच रानडुकराने तोडून य मांडीवर मोठी जखम केले आहे.

जखमी झालेल्या दोघांना तातडीने व खासगी वाहनाने जळगाव येथील व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले ए आहे. यासाठी गावातील पोलीस पाटील संजीव लंगरे सहकार्य केले. याप्रकरणी अद्याप पोलीसातप कोणतीही नोंद करण्यात आलेली ड नाही. वनविभागाचे वनरक्षक जितेंद्र च चिंचोले यांनी जखमींशी चौकशी केली .

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS