जळगावात सुवर्ण कारागीर तरुणाची आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव : – शहरातील जोशींपेठ परिसरात एका सुवर्ण कारागिराने गळफास घेतल्याची धक्कदायक घटना गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून मलाई जगई चक्रवर्ती (वय ३१ रा. पतंग गल्ली, जोशीपेठ जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

शहरातील पतंग गल्लीत मलाई जगई चक्रवर्ती हा तरुण आपल्या आई-वडील पत्नी आणि सहा महिन्याच्या मुलासोबत वास्तव्याला होता. वडीलांसोबत सोन्याचे दागिने बनवण्याचे काम करून तो कुटुंबाला हातभार लावित होता. दरम्यान, गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS