Aapla Davakhana Scam | जळगावातील “आपला दवाखाना” घोटाळ्याप्रकरणी भीम आर्मीचे फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; SIT चौकशीची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Aapla Davakhana Scam फैजपूर | विकी वानखेडे |जळगाव जिल्ह्यातील हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि वर्धनी केंद्र शहरी आरोग्य योजनेत कथित कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात भीम आर्मी भारत एकता मिशनने फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. या निवेदनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे की, १५व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीचा वापर जनतेच्या आरोग्यसेवेसाठी न होता गैरव्यवहारासाठी झाला आहे. यामागे डॉ. भायेकर यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत या घोटाळ्याचा तपशील उघड करण्यात आला होता, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असेही निवेदनात नमूद आहे.

भीम आर्मीने प्रशासनाला १४ ऑगस्टपर्यंत कारवाई करण्याची मुदत दिली आहे. तसे न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

या प्रसंगी भीम आर्मीचे रावेर तालुका अध्यक्ष राहुल निंभोरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राहुल जयकर, तालुका उपाध्यक्ष जुम्मा तडवी, जिल्हा संघटक हेमराज तायडे, संतोष तायडे, अविनाश लहासे, मुकद्दर तडवी, मोसिम तडवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

जळगावात चर्मकार समाजाचा गुणवंत गौरव सोहळा २७ जुलै रोजी

Aapla Davakhana Scam

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS