Agriculture Department | जळगाव कृषी विभागातील फाइल खरेदीचा गौडबंगाल; विशेष ऑडिटची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Agriculture Department | साक्षदिर न्यूज । सुनिल भोळे । जळगाव जिल्हा कृषी कार्यालयात झालेल्या कार्यालयीन साहित्य खरेदी प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या विभागाने तब्बल 7,52,000 रुपयांच्या फाइल्स मागविल्याचा दावा आर टी आय च्या माध्यामातून हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे . इतक्या मोठ्या प्रमाणात फाइल्स खरेदी करण्यामागील काय हेतू होता ते कारण स्पष्ट झालेले नाही. हि संपूर्ण माहीती हि माहिती अधिकारात मागविण्यात आली आहे ह्या कार्यालयात माहिती अधिकार कायदा लागू करताना कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असून, फाइल खरेदीच्या प्रकरणात जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

- Advertisement -

अनियमिततेचा आरोप

या प्रकरणात माहिती घातली असता कार्यालयीन साहित्य वाटप रजिस्टरही उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे, ज्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्हा प्रशासनाला लागणाऱ्या फाइल्सपेक्षा जास्त संख्येने फाइल्स ह्या एकाच कार्यालयात खरेदी करण्यात आलेल्या आहेत , वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने या अनियमितता वाढत असल्याचे मत व्यक्त होत आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितल्यासही संबंधितांना पूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

तक्रार आणि ऑडिटची मागणी

या प्रकरणी शेतकरी आणि नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी देण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी ही तक्रार सादर करून जळगाव कृषी विभागाच्या सर्व कारभाराची विशेष ऑडिट करण्याची मागणी करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे प्रशासनातील गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सखोल चौकशी

सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नागरिकांमध्ये या प्रकरणाबाबत संतापाचे वातावरण आहे आणि पारदर्शक तपासणीची मागणी जोर धरू लागली आहे.

Agriculture Department

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS