Jalgaon Crime News | एअरपोर्ट रोडवर थरार! गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या दोघांना पोलिसांचा सिनेमॅटिक पाठलाग करून अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरालगतच्या कुसुंबा आणि एअरपोर्ट रोड परिसरात गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी थरारक पाठलागानंतर अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि स्पोर्ट्स बाईकसह एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना एअरपोर्ट रोड परिसरात एक तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तात्काळ कारवाईचे नियोजन केले.

पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, विशाल कोळी आणि नितीन ठाकूर यांच्या पथकाने एअरपोर्ट जवळील तारा बिझनेस पार्क परिसरात सापळा रचला.

- Advertisement -

२८ मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास पल्सर मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून दोघांनाही पकडण्यात यश मिळवले.

अंगझडतीदरम्यान एका संशयिताच्या कमरेला लावलेला गावठी कट्टा आणि खिशात तीन जिवंत काडतुसे आढळून आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दीपक ठकुबा गुंजाळ (वय २८, रा. दुर्गानगर, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि विठ्ठल रंगनाथ सोनवणे (वय २५, रा. दुर्गानगर, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आहेत.

प्राथमिक चौकशीत संशयितांनी हा कट्टा जळगावमधील तांबापुरा भागातील अजय बिरजू गारुंगे याच्याकडून घेतल्याची कबुली दिली आहे. अजय गारुंगे सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोउनि चंद्रकांत धनके आणि पोकॉ चेतन पाटील करत आहेत.

Jalgaon Crime News

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Bhadgaon News | भडगावच्या बाळद रस्त्यावर वेगावर ब्रेक! नागरिकांच्या...

Bhadgaon News भडगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील बाळद रस्ता काँक्रिटीकरण झाल्यानंतर वाहनांच्या वेगात मोठी वाढ झाली होती. या रस्त्यावर...

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

RECENT NEWS