Electric Shock Death | जळगावात बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, लहान भाची गंभीर – परिसरात हळहळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Electric Shock Death | साक्षीदार न्यूज | सुनिल भोळे | जळगाव शहरातील अक्सानगर परिसरातील संतोषी माता मंदिर रोडवर शुक्रवारी सकाळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा झटका लागल्याने वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर लहान भाची गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मास्टर कॉलनी परिसरातील अक्सानगर येथे मौलाना साबीर खान नवाज खान (वय ३६) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास त्यांची १२ वर्षीय भाची मारिया फातिमा गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेली होती. यावेळी तिचा स्पर्श जवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीला झाला आणि तिला जोरदार विजेचा झटका बसला.

मुलीला वाचवताना घडला अनर्थ

- Advertisement -

मारियाला विजेचा झटका बसल्याचे लक्षात येताच तिची मामे बहीण आलिया (वय १६) तिला वाचवण्यासाठी धावून गेली. मात्र, दुर्दैवाने तिलाही विजेचा झटका बसला. दोन्ही मुली अडचणीत सापडल्याचे पाहून वडील मौलाना साबीर खान यांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. पण तेही त्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आले आणि त्यांनाही जोरदार झटका बसला.

बाप-लेकीचा मृत्यू, भाची गंभीर जखमी

या भीषण घटनेत मौलाना साबीर खान आणि त्यांची मुलगी आलिया यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर १२ वर्षीय मारिया फातिमा गंभीर जखमी झाली असून तिला तत्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी, महावितरणवर आरोप

घटनेनंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. यावेळी कुटुंबीयांनी महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला आहे. नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे .

Electric Shock Death

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS