Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी; MIDC पोलिसांनी मध्यप्रदेशातून आरोपी पकडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशनने तत्काळ कारवाई करत मध्यप्रदेशातून दोन आरोपींना अटक केली आहे.

- Advertisement -

या प्रकरणातील फिर्यादी पंढरीनाथ पाटील हे परिवारासह त्यांच्या मूळ गावी धानवड येथे गेले होते. दरम्यान, सकाळी शेजाऱ्यांनी फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर पंढरीनाथ पाटील हे तात्काळ जळगावला परत आले. घराची पाहणी केली असता लाकडी कपाट उघडे असून त्यातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी MIDC पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 79/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(3), 331(3)(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हे शोध पथकाची वेगवान कारवाई

- Advertisement -

MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी या घरफोडीचा गुन्हा उघड करण्यासाठी गुन्हे शोध पथकाची नियुक्ती केली. या पथकात पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, पोहेकों किरण चौधरी, पोकों विशाल कोळी यांचा समावेश होता. पथकाने गोपनीय माहिती घेत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला.

मध्यप्रदेशातून आरोपी ताब्यात

पोलिसांनी मध्यप्रदेश राज्यात जाऊन खंडवा जिल्ह्यातील पुनासा तहसील अंतर्गत इनपुन पुनर्विकास परिसरात सापळा रचला. त्यानुसार दिनांक 01 फेब्रुवारी 2026 रोजी खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले—

सुखदेव रामसिंग टाक, वय 36 वर्षे, रा. इनपुन पुनर्विकास, पोस्ट मंधाता, ता. पुनासा, जि. खंडवा, मध्यप्रदेश

आकाश दिनेश वाघे, वय 19 वर्षे, रा. इनपुन पुनर्विकास, पोस्ट मंधाता, ता. पुनासा, जि. खंडवा, मध्यप्रदेश

तसेच या गुन्ह्यात एका विधीसंघर्ष बालकाचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

चोरीचा मुद्देमाल व वाहन जप्त

आरोपींकडून चोरीस गेलेले 19 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेले सुमारे 4 लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन आणि वाहनात मिळालेले लोखंडी पकड (पेंचिस), स्क्रू ड्रायव्हर व एक लहान चाकू असा साहित्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

न्यायालयीन कारवाई, पुढील तपास सुरू

अटक करण्यात आलेले आरोपी सुखदेव रामसिंग टाक आणि आकाश दिनेश वाघे यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकों किरण चौधरी आणि पोकों योगेश घुगे हे करीत आहेत.

ही संपूर्ण कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव), नितीन गणापुरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

LIVE । दादांना अखेरचा निरोप । लाखो जनसमुदायांच्या डोळ्यात पाणी…

राजकारणातील ” दादा ” माणूस गेला

Jalgaon News

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS