Women’s Day Jalgaon जळगाव | साक्षीदार न्यूज | चर्मकार महिला संघातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव येथे रविवार, दि. 8 मार्च रोजी संत रोहिदास प्रतिष्ठान सभागृह, गिरणा पंपिंग रोड येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार आणि मार्गदर्शनपर भाषणांनी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रामाई फुले यांच्या कार्याची आठवण करून देण्यासाठी इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारत एकपात्री अभिनय सादर केला. या सादरीकरणाला सौ. उज्वला वाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. जयश्रीताई विसावे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका सौ. सुरेखाताई तायडे, सौ. भारतीताई बाविस्कर, सकाळ सन्मान पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका सौ. उज्वलाताई वाडेकर आणि सौ. ज्योतीताई निंभोरे उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रा. सौ. मीनाक्षीताई वाघमारे यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून “मी सावित्री बोलतेय” या विषयावर प्रभावी एकपात्री अभिनय सादर करत त्यांच्या जीवनकार्याची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी तथा नगरसेविका सौ. सुरेखाताई तायडे यांनी उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी सर्व क्षेत्रांत प्रगती करत आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. ज्योतीताई निंभोरे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. डॉ. सौ. हेमाक्षी वानखेडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रतिभाताई बाविस्कर यांनी केले, तर आभारप्रदर्शन सौ. सुशीलाताई मोरे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संत रोहिदास प्रतिष्ठान व गुरु रविदास क्लबचे पदाधिकारी व सदस्य तसेच सौ. शारदाताई वानखेडे, सौ. वसुंधराताई भवरे, सौ. लीनाताई बाविस्कर, सौ. स्मिताताई गवळी, सौ. ज्योतीताई शिरसाठ, सौ. सुनीताताई टेमकर, सौ. सुनीताताई अहिरे, सौ. मंगलाताई वाघ, सौ. जयश्रीताई बाविस्कर, सौ. ज्योतीताई सोनवणे, सौ. सुषमाताई निंबाळकर, सौ. जयश्रीताई वानखेडे, सौ. लताताई वानखेडे, अपूर्वा बाविस्कर आदींनी सहकार्य केले.








