Jalgaon Charmakar Samaj | साक्षीदार न्यूज | चर्मकार विकास संघ, जळगाव जिल्हा आणि गुरु रविदास क्लब, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता सरदार वल्लभाई पटेल सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटजवळ, जिल्हापेठ, जळगाव येथे चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि समाज बांधवांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. संजय सावकारे आणि जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. संजय खामकर उपस्थित राहणार असून, आमदार, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर पाहुणे यांच्या उपस्थितीत गुणवंतांचा सन्मान करण्यात येणार आहे.
चर्मकार समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या बांधवांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून समाज बांधवांनी आणि नागरिकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.