Jalgaon Charmakar Sangh साक्षीदार न्युज | जळगाव, ७ जून २०२५ | जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघाची सहविचार सभा व नवीन कार्यकारिणी निवड तसेच सेवानिवृत्त आणि आदर्श पुरस्कार प्राप्त समाज बंधूंचा सत्कार सोहळा शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला चर्मकार विकास संघाचे प्रदेश अध्यक्ष संजय खामकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ सावकारे, संजय वानखेडे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, चर्मकार संस्थांचे अध्यक्ष वसंतराव नेटके, काशीनाथ इंगळे, खंडू पवार, संजय भटकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि समाज बंधू-भगिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत रविदास महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि संत रविदास यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त झालेले आणि आदर्श पुरस्कार प्राप्त समाज बंधू सतीश शिंदे, शिवराज कळसकर, निवृत्ती सूर्यवंशी, संजय भारुळे, नारायण तायडे, रमेश भोळे, प्रकाश रोजतकर, कैलास वाघ, बाळकृष्ण खिरोळे, रतीराम सावकारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या सभेत जळगाव जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. जिल्हा अध्यक्षपदी ॲड. अर्जुन भारुळे, कार्याध्यक्ष राजेश वाडेकर, सचिव प्रा. धनराज भारुडे, सहसचिव संदीप ठोसर, उपाध्यक्ष विजय पवार आणि गजानन दांडगे, युवा संघटक शिवराज कळसकर, खान्देश विभागीय अध्यक्ष मनोज सोनवणे, जळगाव महानगर अध्यक्ष कमलाकर ठोसर, कार्याध्यक्ष पंकज तायडे, उपाध्यक्ष प्रा. संदीप शेकोकार आणि यशवंत वानखेडे, सचिव पंकज भारुळे, प्रसिद्धी प्रमुख लोकेश भारुडे, युवा संघटक योगेश वाडीले यांची निवड झाली. तसेच तालुका स्तरावर जळगाव तालुका अध्यक्ष रवींद्र नेटके, सचिव ज्ञानेश्वर शेकोकार, उपाध्यक्ष सिताराम राखुंडे, भुसावळ तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर, बोदवड तालुका अध्यक्ष अनंत निंबाळकर, चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत सोनवणे, जामनेर तालुका अध्यक्ष अरुण सावकारे आणि सचिव किरण सुरवाडे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय खामकर यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करत समाजाला संघटित करून सर्वांगीण विकासासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा. धनराज भारुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन दांडगे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वनाथ सावकारे, संजय वानखेडे, ॲड. अर्जुन भारुळे, पंकज तायडे, शिवदास कळसकर, काशीनाथ इंगळे, योगेश वानखेडे, लोकेश भारुळे, कमलाकर ठोसर यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित समाज बंधू-भगिनींनी या सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरण प्रदान केले.








