Kharat of Jalgaon | नाशिकच्या खरातनंतर आता ‘जळगावचा खरात’ कोण? जिल्हा परिषद अभियानातील ‘तो’ रुबाबदार कंत्राटी कर्मचारी कोण?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Kharat of Jalgaon साक्षीदार न्यूज । सुनिल भोळे । देशात सध्या नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या भोंदू बाबामुळे राजकारनात अनेकांचे धाबे दणाणले आहे. या बाबामुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाखनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. समाजामध्ये अशोक खरात सारख्या लोकांनी महिलांचा अनेक प्रकारे गैरफायदा घेतलेला आहे. असे अनेक कारणे आहेत कि ज्यामुळे महिलांचा शाररिक फायदा घेतला जात आहे. कधी असे ढोगी बुवा बाबा, तर कधी नोकरी करताना वरिष्ठाकडून, अशा अनेक प्रकारे महिलांचे छळाचे प्रकार सुरु आहे.

- Advertisement -

त्यात सरकारी कार्यालयात देखील मागे नाही सरकरी कार्यालयात महिलांवर जर अत्याचार झाले तर त्यासाठी एक समिती असते परंतु ती समिती प्रत्यके वेळेस महिलांनी साथ देईलच असे नाही. आपण अनेक वेळा कार्यालयात वरिष्ठांकडून महिला कर्मचार्याबरोबर अत्याचाराच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील वरिष्ठाकडून होणाऱ्या अत्याचारात अनेक महिला ह्या कुणाला सांगत देखील नाही. परंतु जिल्हापरिषदेच्या विभागच्या एका अभियानात धक्कादायक प्रकार घडला आहे . या अभियानात मागील काही वर्षांपूर्वी महिलांवर लैंगिक छळाच्या निनावी तक्रारी दाखल झाल्या होत्या ह्या बाबत साक्षीदार न्यूजने कार्यालय प्रमुखांना विचारणा केली होती. परंतु कार्यालया प्रमुखांनी सांगितले होते कि हा कार्यालयाचा विषय आहे, आम्ही त्याचा तपस करीत आहोत. परंतु त्या तक्रारींचे काय झाले हे आज देखील गुलदस्त्यातच आहे. काही महिन्या नंतर या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती त्यात त्याने लिहले होते कि माझ्या आत्महत्या कारण्यामागचे कोणकोण जबाबदार आहे त्यात त्याने त्या सर्वांचे नाव लिहले होते. परंतु याचे पुढे काय झाले ते आज तागायत समजले नाही.

परंतु आता गेल्या काही दिवसापासून हाच विभाग पुन्हा एकदा जिल्ह्यात चर्चेला आला आहे , या अभियानातील एक रुबाबदाबर कंत्राटी कर्मचारी आहे कि, ज्याचा रुबाब हा जिल्हाधिकारी पेक्षा कमी नाही गेल्या अनेक वर्षांपासून हा कंत्राटी कर्मचारी करोडोचे व्यवहार त्याच्या जवळच्या नातेवाईकाच्या सहाय्याने सांभाळत आहे. ह्या कर्मचाऱ्याचे कार्यालयात इतके वजन आहे कि, वरिष्ठ अधिकारी हा कर्मचारी सांगेल तेवढे पाणी पितात अशी परिस्थिती आहे कारण “राजाजी कि जण तोते में” अशी काहीशी परिस्थिती या कार्यालयात आहे. अनेक वेळा ह्या कर्मच्यार्या विरुद्ध अनेक बातम्या प्रसारित झाल्या परंतु जेवढ्या जास्त बातम्या तेवढे त्या कर्मचाऱ्याला मोठे काम सांभाळायची जबाबदारी दिली जाते. ह्या कर्मचाऱ्याने काही वर्षांपूर्वी मोठा घोटाळा केल्याचे देखील बोलल्या जात आहे. काही दिवसांपूर्वी ह्या कर्मचाऱ्याबद्दल एका महिलेने धक्कादायक तक्रार एका मंत्रींकडे केली असल्याची देखील चर्चा आहे. मंत्री महोदयांनी त्यांची गंभीरता ओळखत खाजगी सचिवाला सांगून संबंधित कार्यालय प्रमुखाला या बद्दल सांगण्याचे सांगितले होते. परंतु ह्या प्रकारनाचे पुढे काय झाले हे सत्य अजून तरी बाहेर आले नाही त्या महिलेवर कुणी दबाव टाकला तर नसेल ना ? परंतु जिल्ह्यात ह्या घटनेची जोरदार चर्चा अजूनही सुरुच आहे. काही ठिकाणी तर अशी देखील चर्चा आहे कि, ह्या अभियाणातील खरातवर कारवाई कधी होणार? आणि संबंधित महिलेला न्या य मिळणार का? या कार्यालायातील वरिष्ठ अधिकारी संबंधित महिलेवर दबाव टाकून तक्रार मागे घ्यायला लावणार तर नाही ना ? अशी देखील चर्चा रंगू लागली आहे. या प्रकरणाचे पूढे काय होते? का पुन्हा अजून नवीन जबाबदारी दिली जाते काय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

वाळू चोरीचं ‘रेट कार्ड’ पोलिसांनीच केले व्हायरल आलं समोर! कुणाला किती ‘पेढे’ आणि कुणाचं ‘रिचार्ज’?

महापालिकेच्या टेंडरवरून जळगावात तुफान राडा; पोलीस ठाण्यात मारहाण

“वाळू माफियांसमोर प्रशासन शरण? जळगावात पुन्हा जीव गेला, नागरिकांचा थेट सवाल!”

चोपडा तालुक्यातील अकुलखेड्यात थरार! इन्स्टाग्रामवरील प्रेम प्रकरणाचा रक्तरंजित अंत! 😱

Kharat of Jalgaon

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

RTO Auto Ricksha | ८ एप्रिलला जळगाव आरटीओवर ऑटोचालकांचा...

RTO Auto Ricksha जळगाव | साक्षीदार न्यूज | राज्यातील ऑटो रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी येत्या ८ एप्रिल रोजी जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर...

Jal Jeevan Mission | दहिगाव जलजीवन योजनेवर संशयाची सावली;...

Jal Jeevan Mission  यावल | मिलिंद जंजाळे  | यावल तालुक्यातील दहिगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांबाबत अनियमिततेचे आरोप पुढे येत...

Government Corruption | विकासकामांच्या नावाखाली ‘20% कमिशन’चा आरोप; ठेकेदाराचा...

Government Corruption | यावल | मिलिंद जंजाळे | “जनतेची सेवा” करण्याची शपथ घेतलेल्या काही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर विकासकामांच्या बदल्यात ठेकेदारांकडून सुमारे २० टक्के कमिशन...

RECENT NEWS