Jain Sports Academy | जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी बॅडमिंटन स्पर्धेचे बक्षीस वितरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jain Sports Academy | साक्षीदार न्यूज |जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित यानेक्स सनराइज् जी एच रायसोनी मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित जळगाव ओपन या बॅडमिंटन स्पर्धेत आज अंतिम सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यानंतर लगेचच बक्षीस वितरण करण्यात आले.

- Advertisement -

बक्षीस वितरण समारंभासाठी जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे अध्यक्ष रजनीकांत कोठारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समवेत या स्पर्धेचे मुख्य पंच ब्रिजेश गौर जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी सदस्य चंद्रशेखर जाखटे सहसचिव तनुज शर्मा जैन इरिगेशनचे अरविंद देशपांडे यांची उपस्थिती होती
अंतिम सामन्यांचे उपविजयी व विजयी खेळाडू खालील प्रमाणे
पुरुष एकेरी उपविजेता शुभम पाटील जळगाव
विजेता तेजम केशव जळगाव
महिला एकेरी उपविजेती श्रेया राठोड अहिल्यानगर
विजेती अनन्या शिंदे वाशिम
पुरुष दुहेरी उपविजयी हर्ष शेख व उमर देशपांडे
विजेते निखिल मराठे व शुभम पाटील
मिश्र दुहेरी उपविजेते शुभम पाटील व डॉक्टर वैशाली पाटील जळगाव
विजयी दिग्विजय कंकाल व आनंद शिंदे वाशिम
वरिष्ठ गटाच्या मास्टर्स स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी सामन्यात उपविजेता किशोर सिंग तर विजेता डॉ. अमित राजपूत
महिलांच्या एकेरी गटात उपविजेती प्राची सुरतवाला तर
विजेती वैशाली सरोदे, दोघी जळगाव
पुरुषांच्या दुहेरीत उपविजेता भौतिक कुलकर्णी व राजकुमार मुनोत तर
विजेते किशोर सिंग सिसोदिया व डॉक्टर तुषार उपाध्ये
मिश्र दुहेरीत उपविजेते कीर्ती मुनोत व वृषाली सरोदे तर
विजेते किशोर सिंग सिसोदिया व डॉ. वृषाली पाटील
सर्व विजयी खेळाडूंना सहभागाचे तसेच मेरिट प्रमाणपत्र व मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीज देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन किशोर सिंग सिसोदिया यांनी तर आभार प्रदर्शन सचिव विनीत जोशी यांनी मानले.

Jain Sports Academy

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS