Ramdev Wadi जळगाव (साक्षीदार न्युज ); – रामदेववाडी अपघात प्रकरणात राजकीय दबावातून आरोपींना पोलिसांकडून पाठीशी घातले जात आहे. तपास देखील व्यवस्थित होत नसल्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाचे अविनाश जाधव यांनी तहसीलदार यांना मागणी केली आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की, रामदेववाडी, ता. जि. जळगांव येथे घडून आलेल्या अपघातात एका तरूण महिलेसह तिचे दोन लहान मुले व एका तरूण भाच्याचा अपघातात दुःखद निधन झाले आहे. अपघात घडवून आणणाऱ्या आरोपींच्या बचावासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या पोलिसांवर राजकीय दबाव लादले जात असल्याची परिस्थीती आहे. कारण सदर घटणेचा तपास करीत असलेले जळगांव एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड व तपास अधिकारी मानोरे यांनी सुरुवातीला योग्य ती कारवाई वेळेवर न करता एक प्रकारे आरोपींना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. घटणास्थळावरून ताब्यत घेतलेल्या दोन आरोपींना संबंधीत पोलिसांनी अटक न दाखविता, कोणतीही एम. एल. सी. न घेता पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन केले. आरोपींचे ब्लड हे कोणी, कोठे व कसे घेतले याबाबत कोणताही रिपोर्ट अद्यापही मिळू शकलेला नाही. घटनेच्या दिवशी एम.एच. १९ सी.व्ही.६७६७ या क्रमांची इक्कोस्पोर्ट गाडी होती व त्या गाडीमध्ये प्लॉस्टीक पिशवी मध्ये गांजा आठळून आलेला आहे. तसेच इक्कोस्पोर्ट या गाडी सोबत अजुन एक गाडी ह्या दोघे गाड्या व त्यात बसलेले संशयीत आरोपी यांनी गाड्यांची रेस लावली. सदर संशयीत आरोपी हे नशा पाणी केलेली असल्याने दोघे वाहनांचे ड्रायव्हर व त्यांचे साथिदार यांना सदर रस्त्याबाबत जाणीव असतांना देखील गाडी सुसाट वेगाने चालत होत्या त्यापैकी वरील क्रमांकाची इक्कोस्पोर्ट गाडी ने चार निष्पाप जिवांचा बळी घेतला आहे.
👉🏾 एकनाथ खडसेंनी पोलिसांवर लावले गंभीर आरोप
सदर एम.आय.डी.सी. पोलिसांनी अपघात घडून आणणाऱ्या दोन्हीं गाड्यामधील संशयीतांना व गाडीमध्ये गांजा सापडून आला असतांना याबाबतही सखोल तपास केलेला नाही. या कारणास्तव सदरील पोलिसांना निलंबीत करण्यात यावे. या प्रकरणातील आरोपी हे जिल्ह्यातील बड्या राजकीय व्यक्तींचे मुले असून यांचे जिल्ह्यातील मंत्र्याशी अतिशय जवळचे संबंध आहे. हे पाहता हे प्रकरण दडपून टाकण्याचे प्रयत्न चालु आहे यात शंका नाही. तसेच मुळ फिर्यादी व साक्षिदार यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असून त्यांचे जिवांचे केव्हाही बरेवाईट होऊ शकते. असे झाल्यास त्यास संबंधीत आरोपी व त्यांचे नातेवाईक व शासन प्रशासनच जबाबदार राहतील असा इशारा जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.