साक्षीदार | १४ ऑक्टोबर २०२३ | जळगाव जिल्हा परिषेदेच्या भरती प्रक्रीयसाठी परिक्षा सुरू झाली असुन आता तिसऱ्या टप्प्यात तीन केडरची परिक्षा बुधवार दि. १८ पासून सुरू होणार आहे. बुधवारी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका पदासाठी पहिल्या व दुसऱ्या शिफ्ट मध्ये परिक्षा होणार आहे. दि. २१ आणि २३ रोजी कनिष्ठ अभियंता स्थापत्य / ग्रामिण पाणी पुरवठा या पदासाठी परिक्षा होणार आहे. तर दि. २२ रोजी तीन शिफ्टमध्ये औषध निर्माण अधिकारी यांची परिक्षा होणार आहे.
येत्या २३ तारखेनंतर आता पुढील परिक्षांचे वेळा पत्रक आयबीपीएस कडून जाहिर केले जाणार आहे. ज्या परिक्षांचे वेळापत्रक जाहिर झाले आहे त्याच परिक्षांचे हॉल तिकीट संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील चार केंद्रांवर ही परिक्षा घेतली जात असुन अन्य जिल्ह्यातील काही उमेदवारांचे पेपर देखील जळगाव जिल्ह्याच्या सेंटरवर होत आहे.