Jalgaon | साक्षीदार न्यूज | स्वातंत्र्य दिनानिमित्त माहेश्वरी सभा, बालाजी पेठ, भवानी पेठ आणि बळीराम पेठ परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक शाम देश के नाम’ या भव्य देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन ३ ऑगस्ट २०२५ रोजी आदित्य फार्म येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला सुमारे १,००० समाजबांधवांनी हजेरी लावली. देशभक्तीचा संदेश देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात पाच ते दहा वयोगटांसह ५० वर्षांवरील नागरिकांसाठी फॅन्सी ड्रेस, समूहगीत गायन, जोडी नृत्य आणि समूहनृत्य या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये २०० हून अधिक स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला, तर विजेत्यांचा सन्मान ट्रॉफी आणि मेडल्स देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक म्हणून आदित्य फार्म, निकम अँड लाठी असोसिएट्स आणि सुप्रीम इंडस्ट्रीज यांनी सहभाग नोंदवला. प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर नितीनजी लड्डा उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात शिव लाठी यांनी सांगितले की, हा कार्यक्रम फक्त मनोरंजनासाठी नसून, प्रत्येकाच्या हृदयात राष्ट्रप्रेम जागवण्याचा त्यामागचा उद्देश आहे. सूत्रसंचालनाची धुरा रूपाली लाहोटी आणि जयश्री लाठी यांनी यशस्वीपणे सांभाळला.
पिंप्राळा झोनचा बहुमान
पिंप्राळा झोनने समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. या यशामागे अध्यक्ष मयूर सोमानी, सचिव वितेश भदादा आणि सौ. वीणा सोमाणी यांचे परिश्रम तसेच नृत्य दिग्दर्शक अजय शिंदे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. पिंप्राळा झोनच्या विजयी स्पर्धकांमध्ये सपना अजमेरा, दीपिका अजमेरा, रिंकू मालिवाल, भाविका मालुधाणे, श्रेया सोमानी, नेहा जाखेटे, नेहा जावर, मयूर सोमानी, दर्शन अजमेरा-राजगुरु, अरुणा अजमेरा-गांधीजी, नैतिक कोठारी-सुखदेव, कैवल्य पोरवाल-भगतसिंग, दर्शना जाखेटे-झाशीची राणी आणि हंशिका झंवर-सुभाषचंद्र बोस यांचा समावेश आहे. तसेच, लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मन योगेश मालिवाल यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरवण्यात आले.
आयोजनातील सहभाग
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद झंवर, रमण लाहोटी, शिव लाठी, संतोष समदाणी, राधेश्याम सोमानी, योगिता दहाड, आनंद बिर्ला आणि सारिका मंडोरा यांनी मोलाचा वाटा उचलला. हा कार्यक्रम जळगावातील तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी मोलाचा ठरला असून, येत्या काळातही असे उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.