JALGAON FIRE ; जळगावातील आरएल शोरुमच्या कार्यालयाला आग !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १५ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील रथ चौकात असलेल्या आर. एल. ज्वेलर्स शोरुमच्या चौथ्या मजल्यावरील एका कॅबीनला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. आगीत त्याठिकाणावरील फाईल्स व कॉम्युटर खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रथ चौकात आर. एल. ज्वेलर्सचे शोरुम आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शो-रुममधील चौथ्या मजल्यावर असलेल्या अकाऊंट विभागाजवळील एका रुममधील कॉम्प्युटर ठेवलेल्या ठिकाणी शॉर्ट सर्कीट होवून अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण करीत त्याठिकाणी ठेवलेल्या महत्वाच्या फाईल्स व कॉम्युटर आगीच्या विळख्यात घेतले.यामध्ये ते जळून खाक झाले. या आगीची माहिती जळून मिळतच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग अग्निशमन विभागातील वाहन चालक देविदास सुरवाडे, भगवान पाटील, सरदार पाटील, गिरीश खडके, तेजस जोशी यांच्या पथकाने विझवली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

JALGAON FIRE

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS