Modular Operation Theatre | कोट्यवधींचा घोटाळा उघड? जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या नावाखाली ‘डबल कामां’चा खेळ!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Modular Operation Theatre मॉड्युलर ऑपरेशन थिएटरच्या कामात द्विरुक्तीचा आरोप; डॉ किरण मुरलीधर पाटील यांच्यावर चौकशीची मागणी

Modular Operation Theatre जळगाव | सुनिल भोळे | जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व मॉड्युलर लेबर रूम प्रकल्पांमध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप पुढे आला आहे. या संदर्भात माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे तक्रार दाखल करीत संबंधित कामे तात्काळ थांबवून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

 माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण मुरलीधर पाटील, जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव यांनी ग्रामीण रुग्णालय मेहुणबारे, एरंडोल आणि पारोळा येथे Modular Operation Theatre व Modular Labour Room उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

मात्र, प्रशासकीय मान्यतेतील अटी-शर्तींनुसार एकाच कामाची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित कामे इतर कोणत्याही योजनेअंतर्गत आधी करण्यात आलेली नसावीत, अशी स्पष्ट अट नमूद करण्यात आली आहे. तक्रारदार दिनेश भोळे यांनी एरंडोल, पारोळा आणि मेहुणबारे येथील ग्रामीण रुग्णालयांना प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर, या ठिकाणी यापूर्वीच दोन ते तीन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून Modular Operation Theatre आणि Modular Labour Room उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा त्याच प्रकारची कामे प्रस्तावित करून कोट्यवधी रुपयांचा अपव्यय व संभाव्य भ्रष्टाचार केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या माध्यमातून कमिशन मिळविण्याचा प्रयत्न असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर सदर कामे तात्काळ थांबवून शासनाचे आर्थिक नुकसान टाळावे, तसेच प्रशासकीय मान्यतेच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण मुरलीधर पाटील यांच्यावर चौकशी करून कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तसेच, हा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध झाल्याने प्रकरण गांभीर्याने घेऊन तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भविष्यात कोणतीही न्यायालयीन अडचण निर्माण होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पारोळा कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी वादाच्या भोवऱ्यात;…

Modular Operation Theatre

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kharat of Jalgaon | नाशिकच्या खरातनंतर आता ‘जळगावचा खरात’...

Kharat of Jalgaon साक्षीदार न्यूज । सुनिल भोळे । देशात सध्या नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या भोंदू बाबामुळे...

RTO Auto Ricksha | ८ एप्रिलला जळगाव आरटीओवर ऑटोचालकांचा...

RTO Auto Ricksha जळगाव | साक्षीदार न्यूज | राज्यातील ऑटो रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी येत्या ८ एप्रिल रोजी जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर...

Jal Jeevan Mission | दहिगाव जलजीवन योजनेवर संशयाची सावली;...

Jal Jeevan Mission  यावल | मिलिंद जंजाळे  | यावल तालुक्यातील दहिगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांबाबत अनियमिततेचे आरोप पुढे येत...

RECENT NEWS