Jalgaon Hotel Kamal Paradise Murder | जळगावात हॉटेल कमल पॅराडाइजजवळ ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon Hotel Kamal Paradise Murder |
साक्षीदार न्यूज | जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅराडाइजजवळ शनिवारी रात्री एका ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मयत तरुणाचे नाव आकाश पंडीत भावसार असून, तो अशोक नगर परिसरात राहत होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी चार संशयितांचा शोध सुरू केला आहे.

- Advertisement -

प्राप्त माहितीनुसार, आकाश भावसार हा खासगी कंपनीत नोकरी करत होता. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास हॉटेल ए वनजवळ त्याची पत्नीच्या नातेवाईकांशी भेट झाली. यावेळी काही तरुणांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या छातीवर, मांडीवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्या. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात मयताचे नातेवाईक आणि मित्रांनी मोठी गर्दी केली. आकाश यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

- Advertisement -

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड आणि शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांना चार संशयितांची नावे मिळाली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

जळगाव जिल्ह्यात सध्या खून आणि हिंसक घटनांचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून गुन्हेगारांना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

Jalgaon Hotel Kamal Paradise Murder 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS