जळगाव कारागृहातील सुभेदारासह दोन महिला कर्मचाऱ्यानी घेतली लाच !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ९ नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्हा कारागृहातील कैदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या आईकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना सुभेदार भीमा उखई भिल, पोलिस कर्मचारी पूजा सोपान सोनवणे व हेमलता गयबू पाटील हे धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात दि. ८ नोव्हेबर रोजी अडकले. यातील हेमलता पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी तक्रारदार महिला मुलाला भेटण्यासाठी जिल्हा कारागृहाजवळ आल्या होत्या. त्यावेळी ड्युटीवर असलेले सुभेदार भीमा भिल, पूजा सोनवणे, हेमलता पाटील यांच्यासह इतर जण होते. त्यावेळी मुलाला भेटण्यासाठी महिलेकडून दोन हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार महिलेने याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यानुसार पथकाने बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी सापळा रचला. त्यावेळी कारागृह पोलिस पूजा सोनवणे, हेमलता पाटील यांनी सुभेदार भीमा भिल यांच्या सांगण्यावरून तक्रारदार महिलेकडून २ हजार रुपयांची लाच मागितली. त्याच वेळी धुळे पथकाने हेमलता पाटील यांना रंगेहात पकडले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS