Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात झाला! जळगावात फक्त ५०० रुपयांसाठी तरुणाची निर्घृण हत्या”

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जैनाबाद परिसरात रविवारी अवघ्या ५०० रुपयांच्या मागणीवरून झालेल्या वादात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगाव शहर पुन्हा एकदा हादरले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

नेमकी घटना काय? नितीन नाना काळे (वय ३५, रा. जैनाबाद, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. नितीन हा आपल्या कुटुंबासह जळगावात वास्तव्यास होता. काही महिन्यांपूर्वीच त्याला गोवा येथे कटलरीच्या दुकानात नोकरी मिळाली होती, जिथे तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करत होता. चार दिवसांपूर्वीच तो सुट्टीनिमित्त जळगावात आपल्या घरी आला होता.

रविवारी, २२ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नितीन जैनाबाद परिसरातून जात असताना, संशयित आरोपी शाम तुकाराम सूर्यवंशी याने त्याला अडवून ५०० रुपयांची मागणी केली. नितीनने पैसे देण्यास नकार दिला, ज्याचा राग अनावर झाल्याने संशयित आरोपी शाम याने नितीनवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.

- Advertisement -

उपचारादरम्यान मृत्यू रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नितीनला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक होती. अखेर सोमवारी, २३ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. नितीनच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि भाऊ-बहीण असा परिवार आहे.

याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे.

वाळू चोरीचं ‘रेट कार्ड’ पोलिसांनीच केले व्हायरल आलं समोर! कुणाला किती ‘पेढे’ आणि कुणाचं ‘रिचार्ज’?

महापालिकेच्या टेंडरवरून जळगावात तुफान राडा; पोलीस ठाण्यात मारहाण

चोपडा तालुक्यातील अकुलखेड्यात थरार! इन्स्टाग्रामवरील प्रेम प्रकरणाचा रक्तरंजित अंत! 😱

Jalgaon Crime News

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

RECENT NEWS