Jalgaon Janata Bank Fraud | बँकेत कोट्यवधींचा अपहार, गोर-गरीबांची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon Janata Bank Fraud साक्षीदार न्युज | जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड येथील जळगाव जनता सहकारी बँकेच्या शाखांमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेच्या तत्कालीन शाखा अधिकाऱ्याने स्थानिक एजंट आणि ठाणे जिल्ह्यातील एका कंपनीच्या मालकाशी संगनमत करून गोर-गरीब ग्राहकांचा विश्वास संपादन करत त्यांच्या नावे लाखोंचे कर्ज मंजूर करून रक्कम हडपल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाणे आणि जळगाव पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रारी दाखल झाल्या असून, आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

फसवणुकीचे कसे रचले गेले कारस्थान?

प्राथमिक माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा येथील जळगाव जनता बँकेच्या शाखेत 2022-23 मध्ये शाखा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या बाळु धोंडु टाकरखेडे याने स्थानिक ओळखीचा आणि पदाचा गैरफायदा घेत हा अपहार केला. त्याने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील ‘ब्लिज मार्ट’ कंपनीचा मालक संतोष कुचेकर आणि काही स्थानिक एजंट यांच्या मदतीने गोर-गरीब, निरक्षर ग्राहकांना विविध आमिषे दाखवली. काहींना कर्ज मंजुरीचे आश्वासन देऊन, तर काहींच्या निरक्षरतेचा फायदा घेत त्यांच्या नावे प्रत्येकी 5 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून एकूण 14-15 कोटी रुपयांची रक्कम हडपल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, बँकेच्या सुरक्षा रक्षकालाही 15 लाख रुपयांना गंडवल्याची माहिती समोर आली आहे.

Jalgaon Janata Bank Fraud
Jalgaon Janata Bank Fraud

टाकरखेडे याने सुरुवातीला साधा-भोळा स्वभाव दाखवत लोकांचा विश्वास संपादन केला. काहींना ‘ब्लिज ट्रेडिंग’ कंपनीच्या नावाखाली करारनामे करून, तर काहींच्या घरोघरी जाऊन सह्या आणि अंगठ्यांचा गैरवापर करून कर्ज मंजूर केले. यानंतर त्याची बदली बोदवड शाखेत झाली, तिथेही अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. काही ग्राहकांना भुसावळ तालुक्यातील काहुरखेडा शिवारात 1000 चौरस फूटांचे मोकळे प्लॉट खरेदी करण्याच्या बहाण्याने लुबाडण्यात आले.

- Advertisement -

कर्जाचे हप्ते थकले, तेव्हा उघड झाला प्रकार

सुरुवातीला काही कर्जांचे हप्ते नियमित भरले गेले, ज्यामुळे ग्राहकांना संशय आला नाही. मात्र, वर्ष-दीड वर्षानंतर हप्ते थकू लागले आणि बँकेकडून नोटिसा येऊ लागल्या. यानंतर ग्राहकांनी टाकरखेडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्याने कंपनीच्या अडचणींचे कारण सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. काही वेळा एजंटांमार्फत ग्राहकांना भुलवण्याचा प्रयत्न केला गेला. अखेरीस, हप्ते थकल्याने आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयात प्रकरण पोहोचल्यानंतर 150-200 ग्राहकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

तक्रारी आणि पोलिस कारवाई

फसवणुकीला बळी पडलेल्या ग्राहकांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, परंतु समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बोदवड पोलिस ठाणे आणि जळगाव पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, बाळु टाकरखेडे, संतोष कुचेकर, समाधान नत्थु भोई, विनोद पाटील आणि सुरेश भोई यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली असून, लवकरच अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

बँकेची भूमिका आणि सामाजिक परिणाम

बँकेच्या विद्यमान शाखा अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, तर जिल्हा शाखेतील एका अधिकाऱ्याने माहिती नसल्याचे सांगितले. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून, गोर-गरीब ग्राहकांचा बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत झाला आहे. पोलिस तपासातून संशयितांवर काय कारवाई होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

शिरपूर मर्चंट बँक घोटाळा: १३ कोटींची फसवणूक, ४९ जणांवर गुन्हा – तुमचे पैसे सुरक्षित आहेत का ?

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहविक्रीचा व्यवसाय , पोलिसांनी टाकला छापा ६ महिलांची सुटका

Jalgaon Janata Bank Fraud

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS