Rajput Community | जळगावात महिलांचा स्नेहमेळावा; करणी सेनेच्या युवती शहराध्यक्ष संजना राजपूत यांच्या पुढाकारातून हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Rajput Community जळगाव | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना च्या जळगाव शहर युवती शहराध्यक्ष संजना राजपूत यांच्या वतीने पिंप्राळा येथील गणपती नगर परिसरात हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवार, २३ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता उत्साहात पार पडला.

- Advertisement -

या प्रसंगी करणी सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. सारिका ताई राजपूत तसेच जिल्हा सचिव मीनाताई राजपूत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Rajput Community

- Advertisement -

यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सारिका ताई राजपूत यांनी महिला संघटनाचे महत्त्व अधोरेखित केले. “राजपूत समाजातील महिला जोपर्यंत संघटित होऊन सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय होत नाहीत, तोपर्यंत शासनदरबारी समाजाला अपेक्षित न्याय मिळणे कठीण आहे. त्यामुळे आजच्या काळात महिला संघटन ही गरज बनली आहे,” असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होत, एकमेकांना वेळोवेळी मदत करण्याची भावना निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला.

कार्यक्रमास रत्नमाला पाटील, उज्वला पाटील, सुमित्राबाई पाटील, सुरेखा पाटील, प्रतिभाबाई पाटील, दीपाली पाटील, वैशाली पाटील, कलाबाई पाटील, मायाबाई पाटील, शीतल पाटील, सोनाली पाटील, संगीता पाटील, माधुरी पाटील, धनश्री पाटील, विद्या पाटील, रेखा पाटील, कविता पाटील, मालती पाटील, ममता पाटील, मीना पाटील, संजना पाटील यांच्यासह अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.

हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये स्नेह, एकोपा आणि संघटनाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र या कार्यक्रमात पाहायला मिळाले.

उमेदवार,महिला,कार्यकर्ते यांयाच्यावर पोलिसांचा जोरदार लाठीमार

मतदान केंद्रावर पोलिस आणि उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राढा 

जळगांव मतदान केंद्रावर मतदाराचे ब्रेन वॉश ?

Rajput Community

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS