back to top
गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026

Karni Sena | जळगावात महिलांचा स्नेहमेळावा; करणी सेना व कपिलेश्वर महिला मंडळातर्फे भव्य हळदी-कुंकू सोहळा उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Karni Sena जळगाव | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना जळगाव जिल्हा महिला टीम आणि कपिलेश्वर महादेव महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकूचा भव्य सोहळा शनिवार, २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन करणी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सौ. सारिकाताई राजपूत यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.

- Advertisement -

Karni Sena

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वरणगावच्या लोकनियुक्त नगरसेविका सौ. तृप्तीताई महाजन, पतंजली योग राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. महानंदाताई पाटील, वरणगाव फॅक्टरी येथील पद्मावती ग्रुपच्या अध्यक्ष सौ. वैशालीताई राजपूत तसेच कपिलेश्वर महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. दिपालीताई चौधरी उपस्थित होत्या.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सौ. तृप्तीताई महाजन यांनी महिला जनजागृती आणि संघटनाचे महत्त्व अधोरेखित करत, आजच्या काळात महिलांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सौ. सारिकाताई राजपूत यांनी समाज प्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि स्वसंरक्षणासाठी लाठी-काठी प्रशिक्षण देण्याचा संकल्प जाहीर केला.

Karni Sena

कार्यक्रमात महिलांच्या मनोरंजनासाठी उखाणे, विविध खेळ, संगीत खुर्ची यांसारखे उपक्रम घेण्यात आले. या आनंदी वातावरणात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. मीनाताई राजपूत, कविता राजपूत, संगीता राजपूत, संजना राजपूत, वैशाली सावकारे, संध्या चंदेल, सविता राजपूत, कोकिळा राजपूत, निशा चौधरी, जयश्री नारखेडे, प्रतीक्षा राजपूत, जागृती राजपूत, सविता मोरे, भारती चव्हाण, अनिता राजपूत, प्रियंका राजपूत, सपना राजपूत, प्रमिला राजपूत आदी महिला भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या सांगतेनंतर सर्व उपस्थितांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. या सोहळ्यासाठी श्री कपिलेश्वर महादेव मंदिर ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले.

Karni Sena

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS