Jalgaon Leva Bhavan | लेवा भवन वादाच्या भोवऱ्यात! शासकीय इमारतीत शिंदे गटाचे कार्यालय उघडले; मनपा आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon Leva Bhavan | जळगाव | शहराच्या राजकारणात सध्या लेवा भवन (सरदार वल्लभभाई पटेल भवन) प्रकरणामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या या सुप्रसिद्ध इमारतीत सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेचे कार्यालय उघडण्यात आले आहे. माजी महापौर आणि शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या पुढाकाराने हे कार्यालय सुरू झाल्याचे समजते, ज्याचा व्हिडिओ त्यांनी स्वतः सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.

- Advertisement -

Jalgaon Leva Bhavan

मनपा कराराचे उल्लंघन झाल्याचा आरोप

या गंभीर घडामोडीच्या पार्श्वभूमीवर, जळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक स्व. नरेंद्रअण्णा पाटील यांचे चिरंजीव ॲड. पियुष नरेंद्र पाटील यांनी थेट मनपा आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

ॲड. पाटील यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे की, सरदार वल्लभभाई पटेल भवन ही जागा महानगरपालिकेच्या मालकीची असून ती संबंधित संस्थेला केवळ करारावर (Contract) वापरण्यासाठी दिलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या करारामध्ये सदर जागा कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाच्या कार्यालयासाठी वापरली जाणार नाही, अशी स्पष्ट अट आहे.

मात्र, या अटींचे उघड उल्लंघन करून सत्ताधारी पक्षाने कार्यालय सुरू केले आहे, असे ॲड. पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

कार्यालय जप्त करण्याची मागणी

ॲड. पाटील यांनी मनपा अतिक्रमण विभागाने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांनी हे अनधिकृत राजकीय कार्यालय तात्काळ जप्त करावे आणि भविष्यात कोणत्याही शासकीय किंवा करारावर दिलेल्या जागांचा अशा प्रकारे राजकीय वापर होऊ नये यासाठी कठोर कारवाई करावी, असे आवाहन मनपा प्रशासनाला केले आहे.

विष्णू भंगाळे हे सत्ताधारी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यामुळे या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पालकमंत्री समर्थक असलेल्या गटाने उघडलेल्या या कार्यालयावर मनपा प्रशासन काय भूमिका घेते आणि कोणती कारवाई करते, याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Dharmendra Discharged | मोठी बातमी: अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज! प्रकृती स्थिर, पण ‘मृत्यूच्या अफवांनी’ कुटुंब संतापले!
Mahanagari Express | मध्य रेल्वेत खळबळ: महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा मेसेज! देशविरोधी घोषणांमुळे ‘ISI’ कनेक्शनचा संशय; रेल्वे स्थानकांवर ‘हाय अलर्ट’!
Jalgaon Gold | जळगावच्या सुवर्ण बाजारात मोठी खळबळ: सोने-चांदीची पुन्हा उच्चांकाकडे वाटचाल; दरवाढीमागे ‘हे’ आहे प्रमुख कारण!
Sangli Crime | वाढदिवसाच्या स्टेजजवळच राजकीय नेत्याची ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईलने हत्या; शुभेच्छा दिल्या आणि…

Jalgaon Leva Bhavan

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS