back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Jalgaon Library Book Purchase Corruption | जळगाव ग्रंथालय पुस्तक खरेदी घोटाळा ? : चौकशी समितीच्या भेटी सुरू : आज शहरात होणार तपासणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jalgaon Library Book Purchase Corruption साक्षीदार न्युज | २९ मे २०२५ | जळगाव जिल्ह्यातील ग्रंथालयांसाठी पुस्तक खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे गंभीर आरोप झाल्यानंतर चौकशी समितीने गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रंथालयांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथील साने गुरूजी वाचनालयाचे अध्यक्ष अरूण जगताप यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई सुरू झाली आहे. त्यांनी जिल्हा ग्रंथालय कार्यालयावर बनावट प्रमाणपत्रे तयार करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -
२०१९-२० मधील पुस्तके २०२३-२४

जगताप यांनी ग्रंथालय संचालनालय, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे निवेदन सादर करून निःपक्ष चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, जळगाव जिल्हा ग्रंथालय कार्यालयाने धरणगाव, पारोळा, एरंडोल आणि जळगाव तालुक्यातील अनेक ग्रंथालयांना पुस्तके न पुरवताच त्यांच्याकडून स्वाक्षरी आणि शिक्के असलेली पत्रे जमा करून घेतली. या पत्रांचा वापर करून पुस्तके मिळाल्याची खोटी प्रमाणपत्रे तयार करण्यात आली. माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, काही ग्रंथालयांना २०१९-२० मधील पुस्तके २०२३-२४ मध्येच मिळाली, तर काहींना अद्याप पुस्तकेच मिळालेली नाहीत. विशेष म्हणजे, ९० हजार रुपयांच्या पुस्तकांऐवजी काही ग्रंथालयांना केवळ ३० ते ४५ हजार रुपयांची पुस्तके पुरवण्यात आली.

२०१९-२० आमदार स्मिता वाघ यांच्या निधीतून २० लाख रुपयांची पुस्तके खरेदी

तक्रारीत असा संशय व्यक्त करण्यात आला आहे की, पुस्तक खरेदीसाठी मंजूर निधीचा गैरवापर झाला आहे. २०१९-२० मध्ये तत्कालीन आमदार स्मिता वाघ यांच्या निधीतून सुमारे २० लाख रुपयांची पुस्तके खरेदी करण्यात आली होती. मात्र, अनेक ग्रंथालयांना पुस्तके न मिळाल्याचा दावा तक्रारीसोबत जोडलेल्या लेखी पत्रांमधून करण्यात आला आहे. सर्व प्रमाणपत्रे एकाच ठिकाणाहून टंकलिखित स्वरूपात तयार झाल्याचेही उघड झाले आहे. याबाबत विचारणा केल्यावर जिल्हा ग्रंथालय कार्यालयाने ही जबाबदारी धुळे येथील खासगी पुरवठादार संस्थेकडे ढकलली.

- Advertisement -
उपोषणाचा इशारा जगताप यांनी दिला

जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी आरोप फेटाळले असून, पुस्तके नियमानुसार वितरित झाल्याचा दावा केला आहे. मात्र, तक्रारदारांनी सात वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली आहे. चौकशी समितीच्या भेटींनंतर या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. योग्य न्याय न मिळाल्यास मुंबईत उपोषणाचा इशारा जगताप यांनी दिला आहे.

गेलया दोन दिवसांपासून आलेलीआ चौकशी समिती हि जिल्ह्याभरातीळ ग्रंथालयांना भेट देत आहे . काही ग्रंथालयांनी आम्हला पुस्तके मिळालीच नाही असे देखील या चौकशी समितीला सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे . आता हि चौकशी समिती काय अहवाल सादर करते या कडे जिल्हा वाशीयांचे लक्ष लागून आहे

चाळीसगाव येथील एका ग्रंथालयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि आम्ही आमदारांना पत्र दिलेले आहे कि आपण आमच्या कडून पात्र घेऊन गेले पर्णातू आम्हाला ग्रंथ मिळाले नाही . आणि आमच्या कडे आलेल्या चौकशी समितीला तसे लेखी दिलेले आहे . ( चाळीसगांव ग्रंथालय )

बँकेत कोट्यवधींचा अपहार, गोर-गरीबांची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू

शिरपूर मर्चंट बँक घोटाळा: १३ कोटींची फसवणूक, ४९ जणांवर गुन्हा – तुमचे पैसे सुरक्षित आहेत का ?

Jalgaon Library Book Purchase Corruption

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS